Tarun Bharat

मालवण पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

मालवण :

मान्सून कालावधीत आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचा बचाव करण्याच्या दृष्टीने मालवण पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर गुरुवारी मसुरे गडनदी, खोत जुवा बेट आदी भागात संपन्न झाले.


मालवण पोलीस ठाण्यात उपलब्ध जेमिनी क्राफ्ट रबरी बोटीच्या माध्यमातून मसुरे गडनदी, खोत जुवा या परिसरामध्ये सागरी सुरक्षा शाखेतील अधिकारी साठे, अहमद व अंमलदार चंदनशिवे यांच्या प्रशिक्षणात हे शिबीर संपन्न झाले.  बोट प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरवून बोट चालवण्याचे व बोटीतील साहित्य हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.  यावेळी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस अंमलदार बाबा गिरकर, नाईक, कदम, ढोले, खोत, पुटवाड जाधव, चिपकर, आचरेकर फरांदे, जायभाय आदी उपस्थित होते.

Related Stories

रत्नागिरी : मुबंई-गोवा महामार्गावर कुरधुंडा येथे कंटेनर उलटला, चालक जखमी

Archana Banage

मालवण ग्राहक पंचायत अध्यक्षपदी रत्नाकर कोळंबकर

Anuja Kudatarkar

रेशन दुकानाचा कायमस्वरूपी परवाना न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

Anuja Kudatarkar

दाभोलीचे शिक्षक प्रशांत चिपकर जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत प्रथम

Anuja Kudatarkar

सिंधुदुर्गची सुकन्या कॅनडात अनुभवतेय आणीबाणी

Tousif Mujawar

कोव्हिड रूग्णालयातून मृतदेह नेला उचलून

Patil_p