Tarun Bharat

मालवाहू जहाजाला आग, श्रीलंकेत आम्लयुक्त पावसाचा इशारा

कोलंबो

  मागील आठवडय़ामध्ये कोलंबोच्या किनाऱयावर सिंगापूरचा ध्वज असणाऱया मालवाहू जहाजाला आग लागली होती. या दुर्घटनेमुळे नायट्रोजन डायऑक्साईडचे उत्सर्जन झाल्याने आम्लयुक्त पाऊस पडण्याची शक्यता श्रीलंकेतील प्रमुख पर्यावरण संस्थेकडून व्यक्त केली जात आहे. सध्याच्या खराब हवामानात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. मालवाहतूक जहाज एमव्ही ‘एक्सप्रेस पर्ल’ गुजरातच्या हजीरापासून कोलंबो बंदरापर्यंत रसायन आणि कॉस्मेटिक्ससाठी लागणाऱया कच्च्या मालाची वाहतूक करत होते. सदरच्या जहाजावर 325 मेट्रिक टन इंधनासह 25 टन नायट्रिक ऍसिडही होते. एमव्ही एक्सप्रेस पर्लमधून नायट्रोजन डायऑक्साईडचे उत्सर्जन खूप मोठय़ा प्रमाणात होत असल्याने आम्लीय पाऊस पडणार असल्याचा अंदाज समुद्र पर्यावरण सुरक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष धर्शानी लहंदापुरा यांनीव्यक्त केला आहे. 

………………….

Related Stories

तुर्कस्तान नव्हे, तुर्कीये म्हणा

Amit Kulkarni

अफगाण तुरुंगावर आत्मघातकी हल्ला; 29 ठार

datta jadhav

इटलीत 104 वर्षाच्या आजींनी केली कोरोनावर मात

prashant_c

नेपाळमध्ये पूर, 3 भारतीयांसह 20 बेपत्ता

Amit Kulkarni

संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष वोल्कान बोजकिर यांचा पाकिस्तान दौरा रद्द

datta jadhav

व्यापारी गुपिते चोरणाऱया चिनी नागरिकाला अमेरिकेत अटक

Patil_p