Tarun Bharat

मालवाहू ट्रकची ऊस भरलेल्या ट्रक्टर-ट्रॉलीला जोराची धडक

राष्ट्रीय महामार्गावरील घटना : वाहनांचे नुकसान : सुदैवाने जीवितहानी टळली

वार्ताहर /कोगनोळी

ऊस भरून पुढे चाललेल्या ट्रक्टर-ट्रॉलीला मागून येणाऱया मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने उसाने भरलेली ट्रॉली उलटली. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र ट्रकचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटील मळा, गुटखा कारखान्यासमोर रविवार 6 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सेनापती कापशीहून ट्रक्टर-ट्रॉली (क्रमांक एम.एच 09 यू 9992) हा ऊस भरून कागल येथील शाहू साखर कारखान्याला जात होता. याचवेळी पाठीमागून निपाणीहून कागलच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक (क्रमांक एम.एच 46 ए.एफ 7470) या ट्रकने ट्रक्टर-ट्रॉलीला जोराची धडक दिली. त्यामुळे उसाने भरलेली ट्रॉली महामार्गावर उलटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचालक आणि क्लिनर ट्रकमध्ये अडकल्याने किरकोळ जखमी झाले.

अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेले चालक आणि क्लिनर यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. ही धडक एवढी जोरात होती की, ट्रकने ट्रॉलीला सुमारे 100 फूट फरफटत नेले होते. यामध्ये ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे साहाय्यक फौजदार एस. आय. कंबार यांनी भेट देऊन पाहणी केली.

Related Stories

बाजारात सुक्यामेव्याचे आकर्षण

Omkar B

महामोर्चा-सायकल फेरीत मराठी भाषिकांनो ताकद दाखवून द्या

Amit Kulkarni

काकती ग्रा. पं. च्या नूतन सदस्यांचा सत्कार – शिवजयंती सोहळा साजरा

Amit Kulkarni

कडोलीत गटारी तुंबून नागरिक त्रस्त

Amit Kulkarni

क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा राष्ट्रीय स्तरावरील महान योद्धा

Omkar B

अलतगा ग्रामस्थांचा कचरा डेपोला तीव्र विरोध

Omkar B