Tarun Bharat

मालेरायिचा मुकाबला

जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक मलेरिया अहवाल-2019 नुसार जगातील 89 देशांत मलेरियाचे सुमारे 20 कोटी 28 लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.

 • 2018 मध्ये जागतिक पातळीवर या आजाराचे चार लाखांहून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत.
 • दक्षिण पूर्व आशियातील एकूण तीन देशात मलेरियाचे एकुण 98 टक्के प्रकरणे समोर आली. त्यात एकटय़ा भारताची रुग्णांचे प्रमाण 58 टक्के होते.
 • आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार लहान मुलांना मलेरियाची लागण सर्वाधिक होते. भारत सरकारने फेब्रुवारी 2016 मध्ये मलेरिया निर्मुलन 2016-2030 साठी राष्ट्रीय आराखडा तयार केला.
 • त्याचबरोबर 2027 पर्यंत देशाला मलेरिया मुक्त करण्याचे ध्येय देखील ठेवण्यात आले आहे.
 • पावसाळा हा आपल्याबरोबर मलेरियासारखा धोकादायक आजार घेऊन येतो.
 • मलेरिया हा संक्रमित मादी अनाफिलिज डास चावल्याने होतो. ङडास चावल्याने पॅरासाईटला (विषाणू) शरिरात प्रवेश करण्याची संधी मिळते.
 • हा विषाणू रक्तवाटे लिव्हरपर्यंत पोचतो. तेथे काही काळापर्यंत विकसित होतो आणि नंतर तो लाल रक्ताच्या पेशींना देखील बाधित करु लागतो.
 • सर्वसाधारपणे मलेरियाचे लक्षणे दिसण्यासाठी दहा ते चार आठवडय़ांचा कालावधी लागतो.
 • काही वेळा दीर्घकाळापर्यंत मलेरियाचे विषाणू हे शरिरात सुप्तावस्थेत राहतात.

मलेरिया रोखण्यासाठी उपाय

 • मलेरिया रोखण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे वेक्टर नियंत्रित ठेवणे होय. 
 • मलेरियापासून बचाव करण्यासाठी डास होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.
 • सपूर्ण बाह्या असलेले शर्ट घालावेत. मोकळ्या त्वचेच्या भागावर इन्सेक्ट रेपलेंटचा देखील वापर करु शकतो.
 • दीर्घकाळापर्यंत बाहेर राहत असाल तर अधून मधून क्रीम लावत राहा.
 • खूप पातळ कपडे घालू नयेत. कारण यातूनही डास चावू शकतात.
 • डासांचे प्रमाण अधिक असेल तर रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. हा चांगला उपाय आहे.
 •  आपले घर आणि परिसरात स्वच्छता बाळगावी.

घराचे दरवाजे आणि खिडक्या मोकळ्या ठेवू नयेत.

 • आपल्या लक्षणांवर लक्ष ठेवा. खूप ताप, थंडी वाजणे, हृदयाची धडधड वाढणे आदींकडे लक्ष या. मलेरिया असल्याचा संशय वाटताच तात्काळ डॉक्टराशी संपर्क करावा.
 • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मलेरिया विरोधक गोळ्यांचे सेवन करता येईल. साधारणपणे दोन आठवडय़ांपर्यंत गोळ्या घ्याव्या लागतात. रुग्णांनी औषधी घेण्यात निष्काळजीपणा दाखवू नये.

Related Stories

पतंजलीच्या ‘कोरोनिल’ला केंद्र सरकारची परवानगी; पण…

datta jadhav

स्वच्छता थर्मामीटरची

Amit Kulkarni

N-95 मास्क कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकत नाही

datta jadhav

जाणून घ्या,बहुगुणी कोरफडीचे अनेक फायदे

Kalyani Amanagi

अंडर आर्म्सचा काळपटपणा घालवायचा असेल तर…हे उपाय करून बघा

Kalyani Amanagi

बहुगुणी कढीपत्त्याचे आरोग्यदायी फायदे

Kalyani Amanagi