Tarun Bharat

माळशिरसचे मुख्याधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

गुन्हा दाखल

श्रीपूर/प्रतिनिधी (विनायक बागडे)

येथील माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ दिगंबरराव वडजे यांच्या विरुद्ध एक लाख 26 हजार रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला असून, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार (दि.17) रोजी सापळा रचून कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माळशिरस नगरपंचायतीचे लोकसेवक वडजे यांनी माळशिरस येथील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरणाच्या कामाचे बिलाचा चेक तिरुपती कन्स्ट्रक्‍शन यांच्या खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम मागितली होती. त्याबाबत 30 सप्टेंबर रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सांगली यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 सप्टेंबर ते 22 ऑक्‍टोबर रोजी ब्यूरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता, कारवाईमध्ये मुख्याधिकारी वडजे यांच्याकडे चेक जमा केलेल्या बदल्यात एक लाख रुपये व नवीन काम मिळवून देण्यासाठी 26 हजार असे एकूण 1 लाख 26 हजार रुपयांची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर 22 ऑक्‍टोबर ते 01 नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी वडजे याच्या विरुद्ध सापळा कारवाई आयोजित केली असता मुख्याधिकारी वडजे यांनी संशय आल्याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही. विश्वनाथ वडजे यांच्या विरुद्ध माळशिरस पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला असून सदरची कारवाई पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलिस उपायुक्त सूरज गुरव, सुहास नाडगोडा, उपअधीक्षक सुजय घाडगे, अँटी करप्शन ब्यूरो सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, अविनाश सागर, संजय संकपाळ, अजित पाटील, प्रीतम चौगुले, संजय कलगुडगी, बाळासाहेब पवार यांनी प्रत्यक्ष येऊन कारवाई केली आहे.

Related Stories

तुमच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही; वडिलांच्या आठवणीत रितेश-जेनेलियाची भावनिक पोस्ट

Archana Banage

तरुणांना सशक्त केल्याने भविष्य सशक्त होईल – पंतप्रधान मोदी

Archana Banage

हेमश्री चिटणीस ‘नेट-जेआरएफ’ साठी पात्र…

Anuja Kudatarkar

मंत्री सत्तार पुन्हा एकदा अडचणीत, निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून चौकशीचे आदेश

Archana Banage

ॲमेझॉन, बिग बास्केटला मद्यविक्रीस परवानगी

datta jadhav

रत्नागिरीत झालेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत मुंबईचे ‘सुवर्णतुला’ प्रथम

Abhijeet Khandekar