Tarun Bharat

माळी गल्ली येथे दोघा मटकाबुकींना अटक

मार्केट पोलिसांची कारवाई

 प्रतिनिधी /बेळगाव

माळी गल्ली येथील एका मटका अड्डय़ावर छापा टाकुन दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 18 हजार रोख रक्कम व मटक्मयाच्या चिठ्ठय़ा जप्त करण्यात आल्या आहेत.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकुन दोघा जणांना अटक केली आहे.

अमजद हजीम पठाण (वय 38, रा. जालगार गल्ली), चंद्रशेखर राजू शेट्टी (वय 49, रा. महाव्दार रोड) अशी त्यांची नावे आहेत. या दोघा जणांवर मार्केट पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मटका व जुगारी अड्डय़ांवरील कारवाई पोलिसांनी तीव्र केली आहे.

Related Stories

बळ्ळारीमध्ये पोलिसांसाठी कोविड केअर सेंटर सुरू

Archana Banage

जाधवनगरात बिबटय़ाची दहशत

Amit Kulkarni

बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब विजयी

Patil_p

खानापूरमध्ये दुर्गा दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

प्रशांत दडेदावर यांनी जिंकले 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक

Rohit Salunke

महिलांचा सन्मान करण्यासाठी पौष्टिक आहार मासाचरणाचे आयोजन

Amit Kulkarni