Tarun Bharat

माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. संभाजीराव गोरे यांची निवड

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोल्हापुरात नव्याने स्थापन झालेल्या माळी महासंघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. संभाजीराव गोरे तर महासचिवपदी रामलिंग नाळे यांची नियुक्ती करण्यात आली. महासंघाच्या वतीने वर्षभर समाजबांधवासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये प्रा. गोरे यांची अध्यक्ष, गुरुबाळ माळी उपाध्यक्ष तर  देवेंद्र रास्कर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीत नियुक्त करण्यात आलेली इतर कार्यकारिणी अशी.  रामलिंग नाळे (महासचिव), अंकुश बनसोडे (सचिव), संदीप पुंड (सचिव) , अशोक माळी (सचिव),  मनोज सातव (सहसचिव),  बाबासाहेब चपाले (सहसचिव), विष्णू अडत (सहसचिव),  शिवानंद माळी ( कोषाध्यक्ष)

Related Stories

एफआरपीच्या तुकड्यांवर शेतकऱ्यांच्या बनावट सह्या – राजू शेट्टी

Archana Banage

चोरी करणारी टोळी ४८ तासात जेरबंद

Archana Banage

गडहिंग्लज कारखाना निवडणुका जाहीर झाल्याने हालचाली वेगावल्या

Archana Banage

तोरण आणि धोरण उद्या ठरणार, संभाजीराजेंची उद्या मुंबईत पत्रकार परिषद

Rahul Gadkar

Ratnagiri : गद्दारांनी धाडस दाखवून आपला राजिनामे द्यावेत- आदित्य ठाकरे

Kalyani Amanagi

ग्रामीण भागातील मुली क्रिकेट खेळण्यासाठी पुढे आल्या पाहिजेत : सुनंदन लेले

Archana Banage