Tarun Bharat

माशुकामध्ये प्रेमाचा दिवस साजरा

पुन्हा एकदा अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता रुपेश बने यांची खास जोडी एका नव्या कोऱया माशुका या रोमँटिक गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. सुरसपाटा चित्रपटात शरयू आणि रुपेश एकत्र झळकले होते. शरयू सध्या झी युवा वरील प्रेम पॉयजन पंगा या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली तर रुपेश बने डान्स 5 या नामवंत रिअलिटी शोचा विजेता असून तो सिंड्रेला अतरंगी फंटर या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. आता नव्याने ही जोडी एका रोमँटिक अशा माशुका या प्रेमगीतामधून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे.

यू टय़ूबवर मिलियन व्यूजचा इतिहास रचणाऱया कोळीवूड प्रॉडक्शन अंतर्गत बिग बजेट असे माशुका हे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमीयुगुलांसाठी जणू एक सणच. प्रेमाचा दिवस म्हणून जगभर साजरा होणाऱया या व्हॅलेंटाईन दिनी प्रेमवीरांसाठी हे गाणे एक पर्वणीच असणार आहे. संगीत दिग्दर्शक आणि सुप्रसिद्ध गायक प्रवीण कोळी यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले असून प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत आणि या गाण्याला संगीत देऊन गाण्याची शान वाढविली आहे. गोव्याच्या किनाऱयावर, इष्काची नौका, माझा बाप्पा यासारख्या सुप्रसिद्ध आणि हिट झालेल्या गाण्यांना संगीत दिले आहे.

गायक पुष्पक परदेशी यांनी या गाण्याला सुमधुर स्वरात संगीतबद्ध केले आहे. तर या गाण्यात असणारे रॅप गाणे गायक जे सुबोध आणि रे मार्शल यांनी गायले आहे. संबंध गाण्याच्या संकलनाची जबाबदारी संकलक संदेश कोळी यांनी पेलली. डीओपी म्हणून मितेश तांडेल आणि संदेश कोळी यांनी उत्तम बाजू सांभाळली तर संगीत संयोजक म्हणून तेजस पाडावे आणि योहान शिवशरण यांनी उत्तम साथ दिली. या गाण्याचे खास वैशिष्टय़ म्हणजे हे गाणे इमॅजिका पार्कमध्ये चित्रित झाले असून मराठी अल्बम मधील इमॅजिका पार्कमध्ये चित्रित होणारे पहिले गाणे आहे.

Related Stories

हृता-प्रतीकही लवकरच अडकणार विवाहबंधनात

Archana Banage

मास्टर’पेक्षा वरचढ ठरला ‘वकील साब’

Patil_p

‘द लंचबॉक्स’ चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर सहर अली लतीफ यांचं निधन

Archana Banage

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Archana Banage

अतरंगी रे’मधील भूमिकेचे आईवडिलांकडून कौतुक

Patil_p

अभिनेत्री काजलच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन

Archana Banage