Tarun Bharat

माशेल क्रिकेट लीग स्पर्धेचे विठोबा संघाला विजेतेपद

वार्ताहर /माशेल

माशेल क्रिकेट लीगतर्फे आयोजित क्रिकेट लीग स्पर्धेचे विजेतेपद विठोबा संघाने पटकावले तर उपविजेतेपद देवकीकृष्ण क्रिकेटसला मिळाले. सेमिलुजर बॉम्बे रॉयल्स व बाळ गोपाळ संघाला मिळाले.

अंतिम सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून रिशीकेश नाईक, स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून अरुण परब, उत्कृष्ट फलंदाज रुमेश जल्मी व वैकुंठ गावडे, उत्कृष्ट गोलंदाज उत्कर्ष भगत, युवराज पाटील, उत्कृष्ट फिल्डर गजेश शिरोडकर, उत्कृष्ट  कॅच शैलेश भगत, दयानंद भगत, उत्कृष्ट कॅप्टन अरुण परब, उत्कृष्ट ऑनर सिद्धेश शेट नार्वेकर.

बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, खास आमंत्रित म्हणून जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, उद्योजक लक्ष्मण रायकर, लीगचे चेअरमन निलेश गावडे, शैलेश भगत, ओंकार आमोणक। सत्कारमूर्ती मधुसूदन लवंदे, महेश आमोणकर, रोशन खोलकर व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ खेळाडू शैलेश भगत यांच्याहस्ते प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांचा श्रीफळ, शाल व विष्णूदास परब यांनी तयार केलेले स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर आमदार गोविंद गावडे यांच्याहस्ते महेश आमोणकर, मधुसूदन लवंदे व रोशन खोलकर यांचा माजी खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला.

खेळाडूंनी तंदुरुस्त राहून जिद्द व चिकाटी बाळगण्याचे आवाहन गोविंद गावडे यांनी केले. माशेलचा प्रलंबित मैदानाचा प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी प्रियोळ मतदारसंघातील जनतेचे त्यांनी आभार मानले व भविष्यात असेच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. स्वागत चेअरमन निलेश गावडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रेमानंद शिरोडकर व दया भगत यांनी केले.

Related Stories

फोंडय़ातून 9 संशयित ताब्यात 20 मार्चपासून सिल्वानगर मशिदीत दडलेले

Patil_p

डिचोली तालुक्मयात मुसळधार पाऊस

Amit Kulkarni

पंचायत वॉर्ड पुनर्रचना मसुदा जनतेला उपलब्ध

Amit Kulkarni

टोलटो ते धावजी फेरीसेवा अनियमित

Amit Kulkarni

हडफडे-नागोवा सरपंचपदी श्रीकृष्ण नागवेकर

Amit Kulkarni

रेव्होल्यूशनरी गोवन्सचे शशीराज नाईक शिरोडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Khandekar