Tarun Bharat

माशेल जत्रोत्सवाच्या फेरीत घुसले पाणी

वार्ताहर /माशेल :

माशेल येथे अज्ञात व्यक्तीकडून कचरा जाळण्याच्या नादात प्लास्टिक जलवाहिनी जाळून टाकण्यात आली. फुटलेल्या या जलवाहिनीचे पाणी मालिनी पौर्णिमा जत्रोत्सवातील फेरीत घुसून मिठाई व इतर साहित्य विक्री करणाऱया व्यापाऱयांचे नुकसान झाले.

बुधवारी रात्री जत्रोत्सवाचा शेवटचा दिवस होता. रात्री पालखी मिरवणूक व नाटय़प्रयोग झाल्यानंतर फेरीतील सर्व दुकानदारांनी दुकाने बंद करुन ते झोपी गेले. पहाटे 5 वा. सुमारास अचानकपणे फेरीतील एका रांगेत थाटलेल्या दुकानामध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱयांची एकच धावपळ उडाली. अचानकपणे आलेल्या पाण्याच्या या लोटामुळे व्यापाऱयांना सामान आवरणे कठिण झाले. मिठाईवाल्यांचे तयार खाद्यपदार्थ तसेच इतर सामान पाण्यात भिजून गेले. तसेच खेळणीवाले व इतर दुकानदारांनाही त्याची झळ बसली. अज्ञात व्यक्तींकडून कचरा जाळण्याच्या नादात जलवाहिनी पेटविल्याचे नंतर सर्वांच्या लक्षात आले. पाणी विभागाला या घटनेची माहिती दिल्यानंतर गुरुवारी जलवाहिनीचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले.

 

Related Stories

म्हापसा जिल्हा आझिलो अस्पितळात औषधालयाच्या वेळेत बदल करण्याची नोटीस जारी

Amit Kulkarni

मोरजीला पराभूत करून साई वॅटरन्स उपान्त्य फेरीत दाखल

Amit Kulkarni

काँग्रेसच्या 26 कार्यकर्त्यांना अटक-जामिनावर सुटका

Omkar B

शासकीय शिमगोत्सव समितीतर्फे देवी महालसेला नमन

Amit Kulkarni

फोंडा-पणजी महामार्गावर झाड कोसळले

Amit Kulkarni

शिवरायांचे मंदिर ही संकल्पनाच प्रेरणादायी !

Amit Kulkarni