Tarun Bharat

मासिक पासधारक करणार विशेष रेल्वेने प्रवास

– एक ऑगस्ट पासून योजना सुरु होण्याची शक्यता  

धीरज बरगे / कोल्हापूर

Advertisements

कोरोना प्रादूर्भावामुळे नियमित प्रवाशांसाठी बंद असलेली रेल्वेची दारे लवकरच सुरु होण्याची चिन्हे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली मासिक पास योजना पुन्हा एक ऑगस्टपासून सुरु होण्याची शक्यता आहे. पासधारकांना विशेष रेल्वेने प्रवास करण्यास मुभा देण्याबाबतचा निर्णय लवकरच रेल्वे प्रशासनाकडून होण्याची शक्यता आहे. मासिक पास योजना सुरु झाल्यास नोकरी, शिक्षणानिमित्त नियमित रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून रेल्वेची चाके थांबून आहेत. बहुतांश रेल्वेगाडÎा बंद असून काही ठराविक मार्गावरच विशेष रेल्वे सुरु आहेत. कोल्हापूर रेल्वे स्थानकामधून धावणाऱया गाडÎाही बंद आहेत. विशेष म्हणजे पॅसेंजर गाडीने नोकरी, शिक्षणानिमित्त रोज ये-जा करणाऱया प्रवाशांची संख्या मोठी आहे. स्वतःचे वाहन अथवा एसटी बसच्या प्रवासापेक्षा रेल्वेचा प्रवास माफक दरामध्ये होत असल्याने कोल्हापूर, सांगली, मिरज येथील बहुतांश नोकरदार, विद्यार्थी पॅसेंजर रेल्वेने प्रवास करतात. मात्र सध्या पॅसेंजर रेल्वेच बंद असल्याने त्यांची मोठी गैरसुविधा होत आहे.

कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असल्याने निर्बंधही टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. एसटी महामंडळाकडूनही लांब पल्ल्यावरील एसटी बस सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे अद्यापही थांबूनच आहे. विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी अगोदर रिझर्व्हेशन करावे लागते. रिझर्व्हेशन केलेल्यांनाच रेल्वेने प्रवास करता येतो. त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांना प्रवासासाठी अन्य मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. त्यांची होणारी गैरसुविधा लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून दैनंदिन प्रवाशांना विशेष रेल्वेने प्रवास करण्याबाबत सवलत देण्यासंदर्भातील पाऊले उचलली जात आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

  रिझर्व्हेशनची गरज नाही

 विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी अगोदर रिझर्व्हेशन करणे आवश्यक आहे. रिझर्व्हेशन केलेल्यांनाच विशेष रेल्वेने प्रवास करत येतो. मात्र मासिक पास योजना सुरु झाल्यास पासधारकांना रिझर्व्हेशन करण्याची गरज नाही. रिझर्व्हेशन न करताही त्यांना दैनंदिन रेल्वेप्रवास करता येणार आहे.

 पॅसेंजर रेल्वेगाडÎा सुरु करण्याची मागणी

मासिक सवलत पास योजना सुरु करुन विशेष रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय मध्यरेल्वेकडून होण्याची शक्यता आहे. यानिर्णयाने रेल्वेने नियमित प्रवास करणाऱया प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र याचा सर्वच प्रवाशांना फायदा मिळेल असे नाही. यासाठी थांबून असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाडÎाही सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.– शिवनाथ बियाणी, अध्यक्ष रेल्वे प्रवासी संघटना.

 कोल्हापूर रेल्वे स्थानकातून धावणाऱया विशेष रेल्वे पुढील प्रमाणे

  रेल्वेगाडी                 रेल्वे सुटण्याची वेळ

 कोयना एक्सप्रेस  ः   दररोज सकाळी 8 वाजून 15 मिनिट.

 हरिप्रिया एक्सप्रेस ः   दररोज सकाळी 11 वाजून 40 मिनिट.

 महाराष्ट्र एक्सप्रेस ः   दररोज दुपारी 2 वाजून 35 मिनिट.

 महालक्ष्मी एक्सप्रेस ः  दररोज रात्री 8 वाजून 45 मिनिट.

 कोल्हापूर-धनबाद ः  दर शुक्रवारी दुपारी 4 वाजून 35 मिनिट.

हजरत निजामुद्दीन      दर मंगळवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिट

नागपूर एक्सप्रेस        दर सोमवार व शुक्रवार दुपारी 12 वाजून 45 मिनिट.

कोल्हापूर-अहमदाबाद   दर शनिवारी  दुपारी 1 वाजून 15 मिनिट.   

Related Stories

उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के समाधान करणार – ग्रामविकास मंत्री

Sumit Tambekar

कोगेतील धोकादायक वळणामुळे अपघात, जीवित हानी टळली

Abhijeet Shinde

महामंडळ लुटण्यासाठीच अविश्वास ठरावाची खेळी : मेघराज राजेभोसले

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद सभा दिवाळीनंतरच

Abhijeet Shinde

याद राखा… तर हा संभाजीराजे आडावा येईल!

Abhijeet Shinde

ग्रामपंचायती बिनविरोध करणाऱ्या गावांना अकरा लाखांचा निधी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!