Tarun Bharat

मासेमारीसाठी गेल्यावेळी बेपत्ता झालेल्या युवकाचा थांगपत्ता नाही

Advertisements

वार्ताहर/ खोल

साळेरी-खोल येथील मासेमारीसाठी गेलेल्या व रविवारपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा 24 तास उलटले, तरी आगोंद व खोल येथील किनारी भागांतील ग्रामस्थ तसेच पोलीस पथकाच्या साहाय्याने शोध घेऊनही थांगपत्ता लागू शकलेला नाही. सदर बेपत्ता असलेला युवक सावन (रवींद्र) धर्मू धुरी (वय 43 वर्षे) हा काणकोण आयटीआय केंद्रात प्रशिक्षक म्हणून काम करत होता.

रविवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान खोल येथील अन्य किनारपट्टीवर मासेमारासाठीची जाळी घेऊन तो गेला होता. मात्र तेथे मासे पकडणे अशक्मय व असुरक्षित वाटल्यामुळे घरी येऊन चिकनची व्यवस्था करून तो पुन्हा साळेरी येथील नजीकच्या नदी व दर्याच्या संगमावर गेला होता, असे त्याच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. दुपारच्या जेवणासाठी सायंकाळी 4 पर्यंत तो न परतल्याने त्याचा शोध सुरू झाला.

त्यानंतर संपूर्ण गावातील युवकांनी किनाऱयावर शोधाशोध केली. खवळलेल्या समुद्रात उतरण्याचा धोका पत्करून शोध घेणे जिकिरीचे होते. मात्र काणकोण पोलिसांना सदर युवक बेपत्ता असल्याची तक्रार रविवारी रात्री 10 वा. देण्यात आल्याचे काणकोणचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितले. 20 रोजी सकाळपासून शोधकार्यास सुरुवात करून त्यात निरीक्षक चव्हाण व त्यांचे सहकारी, सागरी पोलीस, काणकोण अग्निशामक दलाचे जवान व स्थानिक नागरिकांनी भाग घेतला. हवाई दलाच्या  सहकार्याने सकाळी व संध्याकाळी हेलिकॉप्टरने शोध घेण्यात आला. पण त्यात यश मिळू शकले नाही.

काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल हेही घटनास्थळी  उपस्थित होते. काणकोणचे उपनगराध्यक्ष गुरू कोमरपंत, नगरसेवक दिवाकर पागी, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, खोल उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई, पंच अजय पागी यांनीही उपस्थिती लावून शोधकार्याबद्दल माहिती  जाणून घेतली. आगोंदचे पंच टिपू पागी व त्यांच्या सहकाऱयांनी पाण्यातील शोधकार्यात योगदान  दिले. ही शोध मोहीम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली. बेपत्ता युवक सावन हा घरातील ज्ये÷ पुत्र असून त्याचे अन्य दोन भाऊ सरकारी सेवेत आहेत. त्यापैकी एक काणकोणातील वाहतूक पोलीस विभागात कार्यरत आहे. संध्याकाळी 7 पर्यंत पारंपरिक होडय़ा घेऊन शोधकार्य अविरत चालू होते.

Related Stories

प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यावा

Patil_p

शॅक व्यवसाय करणाऱयांना त्रास देणे थांबवा -सरदेसाई

Patil_p

सुसंस्कृत समाजासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज

Patil_p

आर्लेमातील स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा

Amit Kulkarni

उद्यापासून पुन्हा ‘टीका उत्सव’

Amit Kulkarni

लोकमान्यच्या तिस्क उसगांव शाखेतर्फे शिक्षकांचा सन्मान

Amit Kulkarni
error: Content is protected !!