आपल्या देशात औद्योगिक सांडपाणी आणि कचऱयाची योग्य प्रकारे प्रक्रिया न करताच त्यांना नदीत सोडले जाते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी नद्यांच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. एखाद्या नदीचे पाणी किती प्रमाणात प्रदूषित आहे, हे समजून घेण्यासाठी आता माशांचा उपयोग केला जाणार आहे. लखनऊ विद्यापीठाच्या प्राणीविज्ञान विभागाने याबद्दल संशोधन केले असून एक उपकरण तयार केले आहे. हे सूक्ष्म उपकरण नदीतील माशांच्या कानातील हाडात बसविले जाते. ज्यामुळे नदीच्या प्रदूषणाची पातळी किती आहे, हे समजू शकते.
नदीतील प्रदूषणाचा माशांच्या कानातील हाडांवर परिणाम होतो, असे संशोधकांना आढळून आले आहे. या हाडांमध्ये मँगेनीज, क्रोमियम आणि शिसे तसेच मॅग्नेशियम या धातूंचे प्रमाण किती आहे, यावर नदीच्या प्रदूषणाची पातळी ठरते. या चारही धातूंची संयुगे औद्योगिक सांडपाण्यामधून नदीत मिसळतात. त्यांचे प्रमाण नदीतील पाण्यात वाढले की त्याचा परिणाम माशांच्या कानातील हाडांवर होतो. उपकरणाद्वारे या हाडातील धातूंचे प्रमाण तपासून नदीच्या पाण्याची प्रदूषण पातळी आजमावता येते, असे संशोधकांना आढळले आहे. या पद्धतीने केलेल्या परीक्षणानुसार यमुना नदीचे पाणी सर्वाधिक प्रदूषित आहे. कारण दिल्लीतील सर्व औद्योगिक कचरा आणि सांडपाणी या नदीत सोडले जाते. हीच नदी पुढे गंगा नदीला मिळत असल्याने गंगेतही प्रदूषण वाढत आहे. माशांच्या डोळय़ांच्या आकारावरूनही प्रदूषण पातळी ओळखण्याचे प्रयोग होत आहेत. माशांचे डोळे त्यांच्या सर्वसामान्य आकारापेक्षा जितक्मया अधिक प्रमाणात मोठे होतील, तितकी प्रदूषण पातळी अधिक असे आढळून येते. वरील चार धातूंप्रमाणेच झिंक, बेरियम, स्ट्रॉन्शियम आणि क्रोमियम आदी धातूंची विषारी संयुगेही उत्तर भारतातील नद्यांच्या पाण्यात अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. प्रदूषण फैलावणाऱया रासायनिक कारखान्यांवर कठोर निर्बंध लादले नाहीत तर पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे कोटय़वधी लोकांना अशक्मय होईल, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.