Tarun Bharat

मास्क तयार करण्यासाठी कस्टम विभाग सरसावला!

रत्नागिरी/ केतन पिलणकर

जिल्हय़ात ‘कोरोना’मुळे सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आह़े  हातावरील पोट असणाऱया कष्टकरी लोकांची उपासमार होत असल्याचे चित्र आह़े अशा आपत्कालीन परिस्थितीत काही अधिकाऱयांमधील माणुसकी जागी होत असून त्याचा प्रत्यय सामान्य नागरिकांना येत आह़े रत्नागिरी सीमाशुल्क मंडळाचे (कस्टम) उपायुक्त अमित नायक अशाच अधिकाऱयांपैकी एक आहेत़  मोफत मास्कबरोबरच ते गरजूंना किराना सामानाचे किटही देत आहेत़

  ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छतेसह मास्क चेहऱयाला लावणे आवश्यक आह़े  मात्र या मास्कची बाजारामध्ये मागणी वाढल्यामुळे तुटवडा पडू लागला होत़ा तसेच ‘कोरोना’शी लढा देणाऱया डाक्टर, नर्स तसेच कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये घरोघरी तपासणी करणाऱया अंगणवाडीसेविका, आशा वर्कर तसेच अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस इत्यादी लोकांना आवश्यक असणारे मास्क अपुरे पडू लागल़े या सर्वांवर सामाजिक जाणिवेतून मास्क तयार करण्याचे अमित नायक यांनी ठरवल़े  या कामी त्यांना त्याच्या कर्मचाऱयांची साथ लाभल़ी त्यानुसार कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर प्रत्येक कर्मचारी व अधिकारी श्रमदान करुन प्रतिदीन सुमारे 100 मास्क तयार करत आहेत. तयार करण्यात येणारे मास्क हे भारत सरकारच्या वैद्यकीय निकषाप्रमाणे तयार केले जात आहेत़  शिवाय हे मास्क योग्यरित्या व स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा वापरण्यायोग्य असल्याचे नायक यांनी सांगितले

  सीमाशुल्क मंडळाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील अधिकारी, कर्मचाऱयांसाठी मास्क वापरणे आवश्यक आह़े  त्यानुसार या विभागासाठी जवळजवळ 3 लाख किंमतीचे मास्क येत होत़े  आता सीमाशुल्क मंडळाने तयार केलेल्या मास्कमुळे सरकारची 3 लाख रुपयांची बचत होणार आह़े  शिवाय हे मास्क कोणी व्यक्ती किंवा सरकारी कार्यालयाने मागितले तर ते त्यांना मोफत देण्यात येणार असल्याचे नायक यांनी सांगितल़े  तसेच बाजारामधील मास्कच्या मागणीवरील ताण कमी येऊन ज्या व्यक्तींना खरोखरच या मास्कची गरज आहे, त्यांना ते सुलभतेने मिळण्यास मदत होणार असल्याचे नायक यांनी सांगितल़े

   केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कौतुक

रत्नागिरी सीमाशुल्क मंडळ सामाजिक जाणिवेतून मास्क निर्मिती करत असल्याचे समजताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रसेवेसाठी तुम्ही दाखवलेल्या दायित्वाबद्दल धन्यवाद, असे ट्विट करुन ट्विटद्वारे रत्नागिरी सीमाशुल्क मंडळाचे कौतुक केल़े तसेच त्यांच्या या कामाची प्रेरणा घेऊन पुणे येथील सीमाशुल्क मंडळाच्या मुख्यालयातही मास्क तयार करण्यात येणार असल्याचे समजल्यानंतर आम्ही करत असलेल्या कामाची प्रेरणा इतरांना मिळत असल्यामुळे वेगळेच समाधान लाभत असल्याचे अमित नायक यांनी सांगितल़े

 रत्नागिरी ते सिंधुदुर्ग जिह्यामधील सागरी सुरक्षेसाठी गस्त घालण्यात येत़े या गस्तीपथकात काही मास्क तसेच किराना मालाचे किटही ठेवण्यात येत आह़े  जेणेकरुन कोणी गरजू दिसल्यास त्याला हे किट व मास्क दिले जात आह़े  त्यामुळे रत्नागिरी सीमाशुल्क मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आह़े

Related Stories

आता घरबसल्या ‘ऑन लाईन’ ट्रेडींग

Patil_p

अतिक्रमणांचा विळखा श्री.छ.प्रतापसिंह उद्यानाला

Patil_p

कुतुबमिनारला विष्णू स्तंभाचे नाव द्यावे!

Patil_p

कोल्हापूर सर्कल येथे रास्ता रोको

Rohit Salunke

सातारा : कोरोना पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रम तात्पुरता तहकूब

Archana Banage

ऑनलाइन कंपन्यांसमोरील अडचणी व आव्हाने

Patil_p