Tarun Bharat

मास्क न वापरणाऱया मुख्यमंत्र्यांनाही अटक करावी

प्रदेश काँग्रेसतर्फे पोलीस उपमहानिरीक्षकांकडे तक्रार

प्रतिनिधी / पणजी

प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांना मास्क न वापरल्याप्रकरणी अटक करणाऱया वास्को पोलिसाला एकतर निलंबित करावे किंवा मास्क न वापरणाऱया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतरांना अटक करण्यात यावी अशी मागणी करून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उपमहानिरीक्षकांकडे तक्रार सादर केली आहे.

दाबोळी ग्रेड सेपरेटर तसेच इतर ठिकाणी मास्क न वापरता व एकमेकांपासून सामाजिक अंतर न राखता कोरोना मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणारे मुख्यमंत्री सावंत तसेच पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, आमदार एलिना साल्ढाना, जोशुआ डिसोझा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोविड सेंटरला विरोध करणाऱयास अटक होत असेल तर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व वीजमंत्री निलेश काब्राल यांनी कुडचडे व केपे येथे कोविड सेंटरला विरोध केला होता. त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे.

Related Stories

साळगाव कचरा प्रकल्पातून घाणीचे पाणी गावात येऊन प्रसिद्ध सालमोना झर, गावातील विहीरी प्रदूषित

Amit Kulkarni

म्हापशाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बदलणार

Amit Kulkarni

1 लाखाची दुचाकी चोरी, एकटा जेरबंद

Amit Kulkarni

राज्यात येणाऱया पर्यटकांना कोविडच्या दोन्ही चाचण्या सक्तीच्या

Amit Kulkarni

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर डिचोली बाजारात आणि सुपर मार्केटमध्ये गर्दी

Amit Kulkarni

विधानसभा अधिवेशनात 751 प्रश्न

Amit Kulkarni