Tarun Bharat

मास्क न वापरल्यास आता 500 रुपयांचा दंड

Advertisements

सोलापूर / प्रतिनिधी

सोलापूर शहर जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन सूरु आहे. दरम्यान आता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास शंभर ऐवजी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे सुधारित आदेश आज शनिवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहे.  उद्या रविवारपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.

सोलापूर ग्रामीण भागातील पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव वाढते प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींना शंभर रुपया ऐवजी पाचशे रुपये दंड करावा अशी विनंती जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 व कलम 64 मधील 36 चा वापर करून वाढविण्यास परवानगी दिली आहे. शंभर रुपयाच्या नसल्याने अनेकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मास्कचा वापर केल्याने कोरोना पासून बचाव होऊ शकतो.  मास्कबरोबर  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टेंस न पाळणे, दारू, पान, तंबाखूचे सेवन केल्यास कारवाई होणार असल्याचे शंभरकर यांनी सांगितले. 

Related Stories

सोलापूर ग्रामीण भागातील निर्बंधांना आजपासून पुन्हा मुदतवाढ

Archana Banage

‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाला संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार

prashant_c

करमाळ्यातील ३८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा आराखडा जाहीर

Abhijeet Khandekar

कार्तिकी वारी निर्बंधातच,दिंड्यांना पंढरपूरकडे जाण्यास मज्जाव

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मंगळवारी नवे ५७ रुग्ण

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यातील दोन शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Archana Banage
error: Content is protected !!