Tarun Bharat

मास्टर ब्लास्टर सचिनचा उद्या बर्थ डे : कोरोना संकटामुळे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या 24 एप्रिलला 49 व्या वर्षात पदार्पण करत आहे. मात्र, संपूर्ण जगावर येऊन ठेपलेल्या कोरोना संकटामुळे यंदा वाढदिवसाचे सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय सचिन तेंडुलकर याने घेतला आहे. 

कोरोना व्हायरस मुळे आपल्या देशात देखील चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या खडतर काळात कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या साठी सचिन यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाही अशी माहिती समोर येत आहे. 


ही वेळ कोणतंही सेलिब्रेशन करण्याची नाही. सध्याच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कोरोनाचा सामना करण्यासाठी घराबाहेर आहेत. अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे सचिनने ठरवले आहे. अशी माहिती सचिनच्या एका मित्राकडून मिळाली आहे. 

दरम्यान, याआधी सचिन तेंडुलकरने कोरोना लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पन्नास लाखांची मदत केली आहे. 

Related Stories

अरविंद केजरीवाल म्हणजे ‘छोटा मोदी’; रणदीप सुरजेवाला यांची टीका

Archana Banage

बीसीसीआयकडून विविध पदांसाठी अर्जांची मागणी

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघाती हल्ला; तीन जवान शहीद, दोन अतिरेक्यांचा खात्मा

Archana Banage

सोळंकी, सोनिया, कौर यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Patil_p

पंकजा मुंडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला

Archana Banage

तिसऱया कसोटीसाठी भारतासमोर निवडीचा पेच

Omkar B