Tarun Bharat

मास्टर माईंड शोधून काढण्यात येईल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा

पणजी/ प्रतिनिधी

पर्वरी खून प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणाचा शोध तोपर्यंत जारी राहील जोपर्यंत  संपूर्ण प्रकरणामागे   असलेला मास्टर माईंड शोधून काढण्यात येईल. तोपर्यंत  सरकार गप्प बसणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिला.

 तरुण भारतशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणात नेमका मास्टरमाइं&ड कोण हे शोधून काढण्याची गरज आहे. विरोधकांनी आजवर सरकारवर अकारण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून टीका केली होती. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत आमच्या सरकारने बहुतांश अशा प्रकरणांचा छडा लावलेला आहे.  खून असू दे मडगावचे हत्या प्रकरण असू दे किंवा एखादे बलात्कार प्रकरण असू द्या सर्व प्रकरणाचा तसेच ड्रग्स प्रकरणाचा देखील छडा लावलेला आहे. आतापर्यंत अनेक वर्षात  जे शक्मय नव्हते ते आमच्या सरकारने या सर्व प्रकरणाचा छडा लावून करून दाखवून दिलेले आहे. या कामी पोलीस प्रशासन उत्तम कामगिरी बजावत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेचे कौतुक केले. पर्वरी प्रकरणात फार कठीण परिस्थितीमध्ये देखील पोलिसांनी गुन्हेगारांचा छडा लावलेला आहे, मात्र या गुन्हय़ामागील खरा सूत्रधार कोण याची माहिती लवकरच हाती येईल व त्यानंतर सरकार योग्य तो न्याय करील, असे ते म्हणाले

वाहन कोणाचे ?

या प्रकरणात गोव्यातून सिंधुदुर्गात जे वाहन गुन्हेगार घेऊन गेले होते ती नेमके कोणाचे व गुन्हेगारांशी त्यांचे कोणते संबंध आहेत याची चौकशी  आवश्यक आहे. यातून अनेक धागेदोरे पोलिसांना मिळू शकतात. या प्रकरणाच्या तळाशी जाऊन प्रकरणात नेमके कोण आहेत याचा शोध आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकरणाचा सखोल शोध घेण्यास सांगितले आहे.

Related Stories

पत्रकार गोविंद खानोलकर यांचे अपघाती निधन

Patil_p

आर्थुर डिसिल्वा यांच्याकडून मडगावातून लढण्याची तयारी

Amit Kulkarni

काँग्रेसच्या सद्बुद्धी यात्रेदरम्यान पोलीस दलाचा गैरवापर

Amit Kulkarni

मडगावः वडिलांना सोडण्यास कोर्टाचा नकार

Omkar B

आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महालक्ष्मी दर्शन घेत केली प्रचाराला सुरूवात

Abhijeet Khandekar

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 454 वर

tarunbharat