Tarun Bharat

मिग 21 कोसळले, पायलटचा मृत्यू

पंजाबमधील मोगा जिल्हय़ात दुर्घटना

चंदिगढ / वृत्तसंस्था

पंजाबमधील मोगा जिह्यात लांगेयाना गावात गुरुवारी रात्री भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले. या अपघातात पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती हवाई दल विभागाकडून शुक्रवारी देण्यात आली. वैमानिकाने पॅराशूटमधून उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला होता मात्र विमानाच्याच जड उपकरणाबरोबर टक्कर झाल्याने त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला.

 हवाई दलाच्या मिग-21 ने सुरतगढ बेसवरून सरावादरम्यान उड्डाण केले होते. हवाई झेप घेऊन परतत असताना त्याला अपघात झाला. हे विमान शेतात कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठा खड्डा पडला. मध्यरात्रीच्या सुमारास मोठय़ा स्फोटाचा आवाज होऊन आग लागल्याचे दिसताच गावकरी घटनास्थळी गेले तेव्हा विमानाचे तुकडे होऊन ते जळत असल्याचे दिसले. विमानाच्या अवशेषांवरून हे भारतीय हवाई दलाचे विमान असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी अग्निशमन दल, डीएसपी जसविंद सिंग पोहोचले होते पण आगीमुळे काही दिसत नव्हते. हवाई दलाची टीम सुद्धा तेथे पोहोचली होती.

Related Stories

”…पण भारत सरकारला याची चिंताच नाही”

Archana Banage

केरळमधील युडीएफचे घोषणापत्र सादर

Patil_p

आता मोदींचे ‘मिशन गुजरात’

Patil_p

मुस्लिमांचे झुंडबळी हा गोडसेच्या हिंदुत्ववादी विचारांचा परिणाम

Archana Banage

ई-श्रम पोर्टलवर 10 कोटी श्रमिकांची नेंदणी

Patil_p

भारत-चीनमधील तणाव नियंत्रणात

datta jadhav
error: Content is protected !!