Tarun Bharat

मिचेल मार्शचे 60 चेंडूत झंझावाती शतक

Advertisements

बिग बॅश लीग – पर्थ स्कॉर्चर्सचा होबार्ट हरिकेन्सविरुद्ध 53 धावांनी एकतर्फी विजय

होबार्ट / वृत्तसंस्था

मिचेल मार्शने अवघ्या 60 चेंडूत नाबाद 100 धावांची आतषबाजी केल्यानंतर पर्थ स्कॉर्चर्सने बिग बॅश लीग स्पर्धेतील साखळी सामन्यात प्रतिस्पर्धी होबार्ट हरिकेन्सचा 53 धावांनी धुव्वा उडवला. होबार्टमध्ये रंगलेल्या या लढतीत पर्थ स्कॉर्चर्सने 20 षटकात 5 बाद 182 धावा जमवल्या तर प्रत्युत्तरात होबार्ट हरिकेन्सला 19 षटकात सर्वबाद 129 धावांवरच गाशा गुंडाळावा लागला.

पर्थ स्कॉर्चर्सतर्फे मिचेल मार्शने 60 चेंडूत शतक झळकावले, त्यावेळी त्याच्या खेळीत 6 चौकार, 5 षटकारांचा समावेश राहिला. लॉरी इव्हान्सने 24 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. होबार्टतर्फे नॅथन इलिसने 4 षटकात 33 धावात 2 बळी घेतले. जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड व संदीप लामिचने यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरात होबार्ट हरिकेन्सतर्फे बेन मॅकडरमॉटने 29 चेंडूत सर्वाधिक 41 धावांचे योगदान दिले. डॅर्सी शॉर्टने 29 चेंडूत 31 धावा जमवल्या. टीम डेव्हिडने 10 चेंडूत 17 तर संदीप लामिचनेने 13 धावा केल्या. पर्थ स्कॉर्चर्सतर्फे टायमल मिल्सने 4 षटकात 23 धावात 3 तर ऍस्टॉन ऍगर (2-21), ऍन्डय़्रू टाय (2-31) यांनी दुहेरी यश संपादन केले. जेसॉन बेहरेनडॉर्फ, पीटर हॅझोग्लू, ऍस्टॉन टर्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Related Stories

भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव

Patil_p

प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी मर्यादित प्रेक्षकांना परवानगी

Patil_p

केन विल्यम्सनला पुत्ररत्न

Patil_p

भारत सातव्यांदा आशियाई चॅम्पियन्स!

Patil_p

बीसीसीआय वैद्यकीय पथकातील सदस्याला कोरोना

Patil_p

अमित पांघल उपांत्य फेरीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!