ऑनलाईन टीम / चंपई :
देशात या दिवसात भूकंपाच्या बातम्या सारख्या येत आहेत. त्यातच आज उत्तर पूर्वेकडील मिजोरम राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले. मिजोरममधील चंपई जिल्ह्यातील दक्षिण पश्चिम भागात दुपारी 2.48 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने यासंदर्भात माहिती दिली आहे.


यापूर्वी काल म्हणजेच 8 जुलै रोजी आसाममध्ये 2.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. याशिवाय जम्मू-काश्मीर मध्ये देेखील भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी होती.
तर 7 जुलै रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार याची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल होती.