Tarun Bharat

मिझोराम पोलिसांनी थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांवर दाखल केला गुन्हा

ऑनलाईन/टीम

आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात सीमावादावरुन सध्या वाद सुरु आहे. दरम्यान, मिझोराम पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आसामच्या ६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर आसाममध्ये कार्यरत असलेले मराठमोळे IPS वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळीलागल्याने ते जखमी झाले आहेत. या सर्व हिंसाचारानंतर आता मिझोरामने थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री हिंमत सरमा यांच्यावर हत्येचा प्रयत्न, कट रचल्याचा आरोप असे अनेक गंभीर गुन्हे लावण्यात आले आहेत. इतंकच नाही तर त्यांना उद्या पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितलं आहे.

मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्र्यांसह सहा वरिष्ठ अधिकारी आणि २०० पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहेत. मिझोराम पोलीस महासंचालक जॉन एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अन्य गुन्हेगारी कलमांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. सीमांत नगरजवळ मिझोराम आणि आसाम पोलिसांमध्ये हिंसक झटापट झाली होती. त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

भारतात कोरोना लसीचे 45 लाख डोस वाया

datta jadhav

2550 विदेशी तबलिगींवर 10 वर्षांची प्रवेशबंदी

Patil_p

लसीकरणाची वर्षपूर्ती; टोचले 157 कोटी डोस

datta jadhav

Panhala Fort: किल्ले पन्हाळगडाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात

Abhijeet Khandekar

सोनोवाल, मुरुगन शपथबद्ध

Patil_p

जम्मू हवाई तळावरील हल्ल्याचा तपास NIA कडे

datta jadhav