Tarun Bharat

मितालीच्या मानधनात कपात, ब यादीत समावेश

बीसीसीआयकडून महिलांची वार्षिक यादी जाहीर

वृत्तसंस्था/ मुंबई

अनुभवी क्रिकेटपटू मिताली राजचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक क्रिकेटपटूंच्या यादीत गुरुवारी ‘अ’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत डिमोशन करण्यात आले आहे. राधा यादव आणि तानिया भाटिया यांचाही ‘ब’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

गतवषी सप्टेंबर महिन्यात टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱया 37 वषीय मितालीचा 50 लाख रुपये वार्षिक मानधन असलेल्या ‘अ’ श्रेणीत अपेक्षेप्रमाणेच समावेश करण्यात आलेला नाही. मितालीकडे सध्या वनडेचे कर्णधारपद असून 2021 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपर्यंत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मात्र ‘अ’ श्रेणीतील स्थान कायम राख्घ्ले आहे. या श्रेणीत स्टार फलंदाज स्मृती मानधनाचाही समावेश करण्यात आला आहे. यािशवाय, मुंबईची 15 वषीय सलामीवीर शेफाली वर्मा आणि हर्लीन देवोल यांना प्रथमच वार्षिक करार मिळाला आहे.

 

श्रेणीनिहाय मानधन

अ श्रेणी (50 लाख रु.) – हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, पूनम यादव.

ब श्रेणी (30 लाख रु.)- मिताली राज, झुलन गोस्वामी, एकता बिश्त, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, तानिया भाटिया.

क श्रेणी (10 लाख रु.) – वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी. हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकार, हर्लिन देवोल, प्रिया पुनिया, शेफाली वर्मा.

Related Stories

‘स्लो स्टार्टर्स’ मुंबई आज केकेआरविरुद्ध लढणार

Patil_p

महान हॉकीपटू चरणजीत सिंग यांचे निधन

Amit Kulkarni

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी निश्चित होईल : बात्रा

Patil_p

श्वार्ट्झमनला पात्रतेसाठी एका विजयाची गरज

Patil_p

क्रिकेट अफगाणच्या सीईओपदी कुरेशी

Patil_p

विश्वविजेत्या न्यूझीलंडवर कौतुकाचा वर्षाव

Amit Kulkarni