Tarun Bharat

मिताली राज ‘दस हजारी’ मनसबदार

तिसऱया वनडेत दक्षिण आफ्रिकन महिला संघाची बाजी

लखनौ / वृत्तसंस्था

आघाडीची फलंदाज मिताली राज शुक्रवारी सर्व क्रिकेट प्रकारात मिळून 10 हजार धावा जमवणारी पहिली भारतीय व जागतिक स्तरावरील दुसरी महिला फलंदाज ठरली. मात्र, भारतीय संघाला द. आफ्रिकेविरुद्ध येथील तिसऱया वनडे सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला संघाने 50 षटकात 5 बाद 248 धावा केल्या तर प्रत्युत्तरात लिझेली ली हिच्या तडफदार नाबाद शतकामुळे द. आफ्रिकन महिला संघाने 46.3 षटकात 4 बाद 223 धावा केल्या. पावसामुळे व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ-लुईस नियमानुसार द. आफ्रिकन संघाला 6 धावांनी विजयी घोषित केले गेले. 

विजयासाठी 249 धावांचे आव्हान असताना ली हिने 131 चेंडूत 16 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 132 धावांची आतषबाजी केली आणि इथेच आफ्रिकन संघाच्या विजयाची भक्कम पायाभरणी झाली. दक्षिण आफ्रिकन महिला संघ या पाच सामन्यांच्या मालिकेत आता 2-1 फरकाने आघाडीवर आहे.

ली हिने 99 चेंडूत 13 चौकार व एका षटकारासह आपले शतक साजरे केले. या मालिकेतील हे पहिलेच शतक ठरले. ली हिच्यासाठी कारकिर्दीतील तिसरे शतक होते. ली व प्रेझ यांनी तिसऱया गडय़ासाठी 97 धावा जोडल्या. ली हिने अपेक्षित धावसरासरी नियंत्रणात असेल, याची काटेकोर दक्षता घेताना आक्रमक फलंदाजीवर भर दिला. द. आफ्रिकेने 46.3 षटकात 4 बाद 223 धावा नोंदवल्या, त्यावेळी पावसाचा व्यत्यय आला. डकवर्थ-लुईस नियमानुसार आफ्रिकन संघ यावेळी 6 धावांनी पुढे होता. त्यानुसार त्यांना विजयी घोषित केले गेले.

तत्पूर्वी, पूनम राऊतने 108 चेंडूत 77 धावांची आतषबाजी केल्यानंतर भारताला आव्हानात्मक धावसंख्या रचता आली. भारतीय कर्णधार मिताली राज (36) ही यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व प्रकारात मिळून 10 हजार धावा जमवणारी पहिली भारतीय फलंदाज ठरली. तिने पूनम राऊतसमवेत तिसऱया गडय़ासाठी 77 धावांची भागीदारी साकारली. स्मृती मानधना (27 चेंडूत 25) मोठी खेळी साकारु शकली नाही. हरमनप्रीत कौरने 46 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला संघ ः 50 षटकात 5-248 (पूनम राऊत 108 चेंडूत 11 चौकारांसह 77, दीप्ती शर्मा 49 चेंडूत 2 चौकारांसह 36, मिताली राज 50 चेंडूत 5 चौकारांसह 36, हरमनप्रीत कौर 46 चेंडूत 4 चौकार, 1 षटकारासह 36. अवांतर 24. शबनीम इस्माईल 10 षटकात 2-46).

द. आफ्रिकन महिला संघ ः 46.3 षटकात 4 बाद 223 (लिझेली ली 131 चेंडूत 16 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 132, मिगनॉन डय़ू प्रीझ 46 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 37. झुलन गोस्वामी 9 षटकात 2-20, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा प्रत्येकी 1 बळी).

मिताली राजचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील योगदान

क्रिकेट प्रकार सामने धावा

कसोटी / 10 / 663

वनडे / 212 / 6974

टी-20 / 89 / 2364

एकूण / 311 / 10001.

महिला जागतिक क्रिकेटमधील सर्वोच्च धावा

फलंदाज / देश /  धावा

शार्लोट एडवर्ड्स / इंग्लंड / 10273

मिताली राज / भारत / 10001

स्टेफानी टेलर / विंडीज / 8846.

Related Stories

प्राग्वे टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान समाप्त

Patil_p

उबेर चषक – कोरियाकडून भारताचा एकतर्फी धुव्वा

Patil_p

‘लाचार मुख्यमंत्र्यांची लाचार सभा’; नवनीत राणांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

Archana Banage

रविकुमार दहिया, नवीन मलिक यांचे आव्हान समाप्त

Patil_p

पश्चिम विभाग संघाची जेतेपदाकडे वाटचाल

Patil_p

दीपक पुनियासह दोन मल्लांना कोरोनाची बाधा

Patil_p