Tarun Bharat

मिरचीशेठचा बाजार रस्त्यातच

वाहनधारकांना बसतोय ठसका, वाहतूकच्या शेलारांनी अनेकदा सांगून झाले

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात अतिक्रमणे उदंड अहेत. त्यातच 501 पाटी ते सदाशिव पेठ या दरम्यान मिरची शेठची दुकाने आहेत. त्यांचा मिरचीचा माल हा रस्त्यावरच असतो. त्यामुळे येणाजाणाऱया वाहनधारकांना त्याचा ठसका बसतो आहे. त्याबाबत अनेकदा वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी विनंती करुन थकले. तर याकडे पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या प्रशांत निकमांची नजर अजून काही पडली नाही. त्यामुळे मिरची शेठच्या रस्त्यात ठेवलेल्या मिरच्यावर कारवाई झाली नाही.

सातारा शहरात प्रामुख्याने महत्वाचा रस्ता म्हणून पोलीस मुख्यालय ते राजवाडा समजला जातो. याच रस्त्यावर सर्वात जास्त वाहतूक केली जाते. याच रस्त्यावर मिरचीची दुकाने आहेत. त्या दुकानांदारांकडून आपल्या दुकानातील मिरचीचा माल हा रस्त्यावरच ठेवण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे मिरचीचा ठसका आपोआपच तेथून जाणाऱया वाहनधारकांना, चालत जाणाऱया सातारकरांना बसतो. दरम्यान, त्याबाबत अनेक सातारकरांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली होती. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी त्या दुकानदारांना अनेकदा विनंती केली. परंतु त्या दुकानदारांकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. आपली मिरच्याची पोती ही रस्त्यावरच ठेवली जातात. त्यामुळे आता पालिकेच्याच अतिक्रमण हटाव विभागाच्या प्रशांत निकम यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होवू लागली आहे.

शहरात अनेक पॉईंट डोळय़ात जातेय अचानक मिरची पावडरसारखा पदार्थ

सातारा शहरात अनेक ठिकाण असे आहेत की तेथून वाहन नेताना किंवा चालत जाताना अचानक डोळय़ात मिरची पावडर जाण्याचा प्रकार घडतो अन् टचकन डोळयातून पाणी येते. काही कळायच्या आत दुचाकी त्या दुचाकी चालकास बाजूलाच घ्यावी लागते. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे, असेही सातारकरांनी केलेल्या सर्व्हेमध्ये निदर्शनास आले आहे.

Related Stories

खूनाची धमकी देणाऱया खंडणीबहाद्दरास अटक

Patil_p

भगवान गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या दसरा मेळाव्याला स्थानिकांचा विरोध

Archana Banage

दहशतवाद विरोधी पथकांची कारवाई

Patil_p

साताऱ्यात नवे १९ कोरोनाबाधित रुग्ण

Archana Banage

वकिलासह पाच जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल

Patil_p

सातारा : 68 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू तर 834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

Archana Banage