Tarun Bharat

मिरजेत ऍसिड गोडाऊनमध्ये स्फोट

अगरबत्ती पेटवताना लागली आग, बचाव कार्य करणारे चौघे पोलीस जखमी

प्रतिनिधी/मिरज

मिरज एमआयडीसी रस्त्यांवर गणेश कॉलनी याठिकाणी असणाऱ्या मिलींद केमिकल आणि मार्केटिंग या सॅनिटरी केमिकल गोडाऊनला अगरबत्ती पेटविताना काडीची आग लागल्याने ऍसिड कँनचा स्फोट झाला. यावेळी ऍसिड कँन आणि बॅरल हटविताना तसेच बचाव कार्य करण्यास गेलेले महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह सुभाष पाटील, चंद्रकांत गायकवाड, अभिजित पाटील प्रवीण हुक्केरे, हे चार कर्मचारी जखमी झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णलयात उपचार करण्यात आले.

शहरातील गणेश नगर परिसरातील ऍसिड फॅक्टरीमध्ये अचानक आग लागली. येथील ऍसिडच्या चार बॅरलचा स्पोर्ट झाला. याठिकाणी भीषण आग लागली असून बचावकार्यासाठी गेलेले अधिकारी आणि कर्मचारी हे जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे.या आगीत गोडाऊन मालक मिलिंद बाबर हे किरकोळ जखमी झाले आहेत. अग्निशामक विभागाच्या चार बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात आली. या आगीमध्ये जवळपास चार लाखांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता मालक मिलिंद बाबर हे देवपूजा करत असताना काडी जमिनीवर पडून कागदाने पेट घेतला. त्यानंतर संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. ऍसिडचा उग्र वास संपूर्ण परिसरात पसरला होता.यावेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

  

Related Stories

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव असावे : राज ठाकरे

Tousif Mujawar

जम्मू काश्मीर : 31 जानेवारीपर्यंत राहणार लॉकडाऊन

Tousif Mujawar

रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीतच होणार!

datta jadhav

खरंच ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; संजय राऊत म्हणाले…

datta jadhav

होरट्टी यांची भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्याची घोषणा

Abhijeet Khandekar

शेतकऱ्यांचा २६ रोजी राजभवनांना घेराव

Amit Kulkarni