Tarun Bharat

मिरजेत घरफोडी करणारी चोरट्यांची टोळी गजाआड

चार लाख, 40 हजारांचा मुद्देमाल जप्त, चोरटे सराईत गुन्हेगार

प्रतिनिधी / मिरज

मिरज शहरातील सुंदरनगर येथे घरफोडी करणाऱया सराईत गुन्हेगार चोरटय़ांच्या टोळीला गजाआड करण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघा चोरटय़ांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दोन लाख, 40 हजार रुपयांच्या मुद्देमालासह एक रिक्षा असा चार लाख, 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त केला आहे.

अनिस अलताफ सौदागर (वय 25, रा. दुर्गानगर, कुपवाड), वैभव आवळे, नेहाल मोमीन, समर्थ गायकवाड (सर्व रा. मिरज) अशी अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांची नांवे आहेत. पोलिसांनी सदर चोरटय़ांकडून 85 हजारांची 65 इंची एलईडी टीव्ही, 30 हजारांची 32 इंची एलईडी टीव्ही, 45 हजारांची 42 इंची एलईडी टीव्ही, 20 हजारांचा लॅपटॉप, 15 हजारांचा कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, वेरणा व इनोव्हा चारचाकी वाहनाच्या चाव्या अशा दोन लाख 40 हजारांच्या चोरीच्या साहित्यासह दोन लाख रुपये किंमतीची रिक्षा असा चार लाख, 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त केला.

Related Stories

एस. टी. कामगारांचे थकीत वेतनासाठी आत्मक्लेश उपोषण

Archana Banage

Ratnagiri : संगमेश्वरमध्ये साडेसात लाखाच्या दागिन्यांची चोरी…दागिने घरातूनच हस्तगत

Abhijeet Khandekar

राशिभविष्य

Patil_p

दूधगंगा उजव्या कालव्यात पडला दहा गव्यांचा कळप

Archana Banage

कोल्हापूर : ताम्रपर्णी नदीला पूर, बाजार पेठेत शिरले पाणी

Archana Banage

‘सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या अर्धवट ऑक्सिजन प्लॅन्टचे काम पूर्ण करा’

Archana Banage