ऑनलाईन टीम / मिरज
मिरज – सांगली रोडवर चालत्या चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री उशीरा घडली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत वाहन पूर्णपणे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. चालत्या वाहनास आग लागण्याचे कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.
एम एच 13 ए यु 0145 या क्रमांकाची क्रुझर सांगली – मिरज रोडवरुन निघाली होती. येथील सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल जवळ आल्यानंतर चालत्या वाहनाला आग लागली. हे लक्षात आल्यानंतर चालकाने वाहन रस्त्याकडेला थांबले.
रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी अग्निशमन विभागास याबाबत माहिती मिळाली. अग्निशमन विभागाचे खंडेराव घुगरे, संतोष हाके, विशाल रसाळ, रोहित निकम यांनी अग्निशमन दलाच्या वाहनासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहनाची आग विझवली, मात्र आगीत वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली.


previous post