Tarun Bharat

मिरजेत तरुणाच्या डोक्यात दगड घालून, गळा चिरून निर्घृण खून

समतानगर येथील घटना

प्रतिनिधी / मिरज

शहरातील समतानगर येथे एका ३५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून तसेच धारदार शास्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोविंद मुत्ती अस खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी रात्री हा खून झाला असून, हल्लेखोर अज्ञात आहेत.

गोविंद आणि त्याची आई हे दोघेजण समता नगर येथे राहण्यास आहेत. शनिवारी रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा खून केला. रविवारी पहाटेच्या सुमारास गोविंद याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे नागरिकांना दिसले. गोविंद याच्या डोक्यात दगड घालून तसेच शास्त्राने गळा चिरून खून झाला असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Related Stories

भाटवाडीत कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

Abhijeet Khandekar

महावितरणचे कर्मचारी फिल्डवर, लॉकडाऊनमध्ये अखंड वीज देण्यासाठी महावितरणची धडपड

Archana Banage

अनवडी येथे युवकाची आत्महत्या

Archana Banage

अंगणवाडी सेवकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी

Archana Banage

सांगली : आटपाडी शहरात ११ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

Archana Banage

सांगली : म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करा

Archana Banage