प्रतिनिधी/मिरज
मिरज शहर पोलिसांनी मिरजेत पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडुन देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जीवंत काडतुसे जप्त केली. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास शहरातील जुना ढवळी रस्तावर ही कारवाई केली.
याप्रकरणी अकबर हारुण मिरजकर (वय 28, रा. सुभाषनगर) याला अटक करुन त्याच्याकडून पिस्तुल, पाच जीवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एक लाख, दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जफ्त करण्यात आला आहे.


previous post
next post