Tarun Bharat

मिरजेत यंदा रामजन्माचा पाळणा रंगलाच नाही

Advertisements

ऑनलाईन टीम/मिरज
दरवर्षी रामजन्माचा पाळणा गाऊन साजरी होणारी रामनवमी यंदा मात्र पाळणा न म्हणताच बंद दाराआड साजरी करावी लागली. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने भाविकांच्या अनुपस्थितीत अनेक मंदिरात रामजन्मोत्सव करण्यात आला. अनेक वर्षात प्रथमच अशा पध्दतीने साधेपणाने रामनवमी साजरी झाली. यंदा भजन, प्रवचनाचे कार्यक्रमही झाले नाहीत. शहरात विविध ठिकाणी ऐतिहासिक राम मंदिरे आहेत. वेणाबाई मठात समर्थांनी वेणाबाईंना दिलेले रामपंचायतन आहे. मिरजेतील सर्वांत जुनी राममूर्ती येथे आहे. पूर्वीपासून येथे रामनवमीचा मुख्य सोहळा होतो. हा सोहळा हनुमान जयंतीपर्यंत सुरू असतो. वेणाबाई मठात दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांनी रांगा लावतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने भाविकांची गर्दी नव्हतीच. मठाधिपतींनी महापूजा आणि अभिषेक करुन आणि मठातील महिलांनी पाळणा गाऊन रामजन्मोत्सव साजरा झाला. तशीच परिस्थिती मालगांव वेसमधील ऐतिहासिक तुलसीदास राममंदिरातही होती. दरवर्षी येथे जन्मसोहळय़ासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. यंदा मात्र मठाधिकाऱ्यांच्या हस्तेच पुजा झाली. एरव्ही गजबजलेला तुलसीदास मठ आज पूर्ण शांत होता. गोठण गल्लीतील काशीद यांचे रामंदिर, पंढरपूर रोडवरील चंदनवाले यांच्या राममंदिरातही साधेपणाने भाविकांच्या अनुपस्थितीत जन्मसोहळा झाला.

Related Stories

सांगलीजवळ माधवनगर मध्ये पिशव्यांच्या कारखान्याला आग

Archana Banage

अश्विनकुमार उर्फ बाळासाहेब लकडे यांचे निधन

Archana Banage

सांगली : बेडग येथे दीड कोटींचे गुटखा साहित्य जप्त

Archana Banage

सांगली जिल्ह्यात दुपारी साडेतीन पर्यंत 68 टक्के मतदान

Archana Banage

शिवाजी नगर येथील आरोग्य उपकेंद्र केवळ नावालाच

Archana Banage

सांगली : चार खासदार असलेल्या पक्षाचा नेता लोकनेता

Archana Banage
error: Content is protected !!