Tarun Bharat

मिरजेत वृध्दाला 46 हजारांचा ऑनलाईन गंडा

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने केली फसवणूक, आठवडाभरात दुसरी घटना

प्रतिनिधी / मिरज

तुमच्या जीओ कंपनीच्या मोबाईल सिमकार्डची मुदत संपत आली आहे. सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी त्याची केवायसी पूर्तता करावी लागेल, असे सांगून एका भामट्य़ाने शहरातील ब्राम्हणपूरी येथे राहणाऱ्या चिंतामणी गजानन हेब्बाळकर (वय 70) या वृध्दाला 46 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. याबाबत हेब्बाळकर यांनी मिरज शहर पोलिसात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली आहे. दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, आठवडाभरात फसवणुकीची ही दुसरी घटना उघडकीस आली आहे.

ब्राम्हणपूरीतील उमा रामेश्वर अपार्टमेंटमध्ये राहण्यास असलेले चिंतामणी हेब्बळकर हे जिओ कंपनीचे सिमकार्ड वापरतात. त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने हेब्बाळकर यांना तुमच्या जिओ नंबरच्या केवायसी अपडेट झालेल्या नाहीत. तुमचा मोबाईल नंबर चालू ठेवायचा असेल तर ऑनलाईन केवायसी अपडेट करावी लागेल. त्यासाठी 10 रुपये फी भरावी लागेल, असे सांगून एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. या ऍपमध्ये जन्म तरीख, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड नंबर तसेच एटीएमचा सीसीव्ही क्रमांक विचारला. त्यानंतर फोन होल्डवर ठेवण्यास सांगून तीन वेळा दहा हजार रुपये आणि एकवेळा 16 हजार असे एकूण 46 हजार रुपये ऑनलाईन लंपास करण्यात आले.

Related Stories

”जख्मी वाघिणीच्या पंजाने चौकीदार झाला घायाळ!”

Archana Banage

महानगरपालिकेमार्फत माझी कृष्णामाई स्वच्छता अभियानाची तयारी पूर्ण – उपायुक्त

Abhijeet Khandekar

आनंद महिंद्रा यांची वचनपूर्ती; इडली अम्माला दिले नवीन घर भेट

Rahul Gadkar

धक्कादायक! कैद्याने मलाशयात लपवले 4 मोबाईल

datta jadhav

शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

Amit Kulkarni

‘हर हर महादेव’चित्रपटाच्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांना अटक

Archana Banage