Tarun Bharat

मिरजेत २०० जणांच्या अँटीजन चाचणीत दोघे कोरोनाबाधित

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

शहरात विकेंड लॉकडाऊनचा नियम धुडकावून भाजीपाला बाजारात गर्दी केलेल्या नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्यात आली. गुरुवार पेठे भाजीपाला बाजारात दोनशे जणांचा स्वॅब तपासणीसाठी घेतल्यानंतर दोघेजण कोरोना बाधित आढळले. महापालिका प्रशासनाने सदर दोघांना तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तसेच विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांकडून साडेतीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

141 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी तर 71 जणांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. मोकाट फिरणाऱ्या नागरिकांपैकी दोघे बाधित निघाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रेखा खरात, नितीन कांबळे, अक्षय कोलप, निखिल कोलप यांच्यासह महापालिका आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभागाने या कारवाईत भाग घेतला.

Related Stories

सांगली : कर्नाटकातील महिलेचा येळवीत मृत्यू

Archana Banage

उमदी-पंढरपूर महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

Archana Banage

सांगली तरुण भारत आवृत्ती प्रमुख मंगेश मंत्री यांना दमसाचा विशेष पुरस्कार

Archana Banage

सांगली : मिरजवाडीत शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू

Archana Banage

सांगलीतील लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक निलंबित

Abhijeet Khandekar

शिराळा तालुक्यातील कणदूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

Archana Banage
error: Content is protected !!