Tarun Bharat

मिरज येथील कवी संमेलनात बेळगावच्या कवींचा सहभाग

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव :

मिरज येथील नवरत्न परिवार व राजेश्री शब्दविष्कार यांच्यावतीने नुकत्याच झालेल्या कवी संमेलनात बेळगावच्या सतरा कवींनी सहभाग नोंदवून आपल्या एकापेक्षा एक विविध विषयांवरच्या कविता सादर करून उपस्थित काव्यरसिकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रसाद पंडित होते. तसेच व्यासपीठावर कुरुंदवाडचे ज्ये÷ कवी दिलीप कुलकर्णी व नवरत्न परिवार आणि साई प्रकाशनाचे संस्थापक प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रारंभी कवी अशोक सुतार यांनी ‘आपलं बेळगाव’ ही कविता सादर करून काव्य मैफिलीस सुरुवात केली. त्यानंतर डॉ. प्रेमा मेणशी यांनी ‘दुरुस्ती’, स्मिता किल्लेकर यांनी ‘झिम्माड पाऊस’, निकिता भडकुंबे यांनी ‘जन्म’, संदीप मुतगेकर यांनी ‘माझी गावाकडची शाळा’, रोशनी हुंदे ‘अजूनही यौवनात मी’, अस्मिता आळतेकर यांनी ‘महापूर’, भरत गावडे यांनी ‘शोकसभा’ आदींसहीत विविध कविता सादर केल्या.

त्याचबरोबर कवी मधु पाटील, चंद्रशेखर गायकवाड, किरण पाटील, विजया उरणकर, विश्वनाथ मुरगोडी, भरमा कोलेकर, आर. के. ठाकुर देसाई यांनीही आपल्या स्वरचित दर्जेदार कविता सादर करून येथील काव्यरसिकांची दाद मिळविली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व कवींचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

Related Stories

टिळकवाडी पोस्ट आवारातील जुनाट वृक्ष कोसळला

Amit Kulkarni

निपाणी, चिकोडीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Patil_p

इन्स्टाग्रामवर वादग्रस्त पोस्ट

Amit Kulkarni

कर्नाटक : लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या विद्यार्थ्यांना केसीईटी देण्यास परवानगी

Abhijeet Shinde

बँकांमधून रोख रक्कम काढणाऱयांची संख्या वाढली

Amit Kulkarni

बीसीएम महिला आत्मसंरक्षण योजनेला प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!