Tarun Bharat

मिरज शहर पोलीस ठाण्यातच तरुणाने घेतले पेटवून

शहरात खळबळ, मारहणीची तक्रार देण्याण्यासाठी आला होता तरुण

प्रतिनिधी/मिरज

मित्रांनी मारहाण केल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या नशेखोर तरुणाने पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतः ला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री मिरज शहर पोलिस ठाण्यात घडली. सरफराज महमदआली जमखंडिकर (वय २६, रा. गुरुवार पेठ, मिरज) असे पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो गंभीररीत्या भाजला असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्यातच तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस वर्तुळासह शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सरफराज जमखंडीकर हा शहर पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यासाठी आला होता. तो नशेत होता. यासीन, अबुबकर, आणि आयुब अशा तिघांनी मारहाण केली आहे. त्यांना आत्ताच अटक करा, असे तो म्हणून दंगा करीत होता.

त्याच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्यातील काही पोलिसांनी त्याच्या सोबत जाऊन खातरजमा केली. मात्र तो नशेत असल्याने पोलिसांनी केवळ तक्रार दाखल करून घेतो असे सांगितले. याचा राग आल्याने सरफराज याने तुम्ही त्यांना आत्ताच अटक करा, मी त्यांच्या पेटवतो असे म्हणून त्याच्या पत्नीच्या हातातून पेट्रोलची बाटली ओतून घेतली. व स्वतः ला पेटवून घेतले. पोलिसांनी तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. सरफराज हा गंभीर भाजल्याने त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला भाजले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे करीत आहेत.

Related Stories

महिला अत्याचार : अभाविप कडेगावच्यावतीने निषेध, कार्यकर्त्यांना अटक

Archana Banage

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद

datta jadhav

अंतराळ विश्वात भारत क्रांतीच्या दिशेने!

Patil_p

सेन्सेक्सचा नवा उच्चांक

Archana Banage

‘एक राष्ट्र एक भाषा’साठी हिच योग्य वेळ : भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

Archana Banage

जवानांना रजेवर जाताना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सेवा

datta jadhav