Tarun Bharat

‘मिली’च्या चित्रिकरणासाठी जान्हवी देहरादूनमध्ये

अभिनेत्री जान्हवी कपूर स्वतःचे वडिल बोनी कपूर यांच्या ‘मिली’ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी देहरादून येथे आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत देहरादून अन् ऋषिकेशमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण चालणार आहे.

चित्रपटात जान्हवीची व्यक्तिरेखा एका रेस्टॉरंटमध्ये पार्टटाइम काम करणाऱया युवतीची आहे. बोनी कपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर लगेच मुंबईत परतले होते. तर जान्हवी आणि अभिनेता सनी कौशल 2 नोव्हेंबरपर्यंत चित्रिकरण पूर्ण करणार आहेत. मुंबईतून 250 जणांचे पथक चित्रिकरणाकरता दाखल झाले आहे. कोरोना चाचणी वारंवार होत रहावी म्हणून मुंबईतून 12 जणांचे वैद्यकीय पथकही पोहोचले आहे.

मिली हा चित्रपट मल्याळी चित्रपट ‘हेलेन’चा रिमेक असणार आहे. हा चित्रपट बापलेकीच्या संघर्षावर आधारित आहे. चित्रपटातील जान्हवीच्या व्यक्तिरेखेच्या आईच्या भूमिकेसाठी देहरादूनमधील स्थानिक कलाकाराचीच निवड करण्यात आली आहे. जान्हवीने देहरादून येथील स्वतःची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.

Related Stories

अल्लू अर्जुनसोबत पुन्हा झळकणार रश्मिका

Amit Kulkarni

नताशा-वरुण धवन विवाहाच्या बेडीत

Patil_p

‘नूरानी चेहरा’मध्ये दिसणार नुपुर सेनॉन

Patil_p

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम ‘या’ अभिनेत्रीचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

‘झुंड’साठी बिग बी-नागराज मंजुळे एकत्र

Archana Banage

एम्बर हर्डला सरोगसीद्वारे मातृत्व

Patil_p