Tarun Bharat

‘मिशन बंधारे’तून लाखो लिटर पाणी संचय!

Advertisements

प्रतिनिधी/ रत्नागिरी

महात्मा फुले जलसंधारण अभियानांतर्गत ‘मिशन बंधारे’ मोहीम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागस्तरावरून राबवली जात आहे. त्यानुसार जिह्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 754 बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात वनराई 125, विजय 167 तर कच्चे 462 इतक्या बंधाऱयांचे उद्दिष्ट लोकसहभागातून गाठण्यात आले आहे.

  गेल्या हंगामात रत्नागिरी जिल्हय़ात एकूण सरासरी पर्जन्यमान 4002.77 मि. मि. झाले आहे. कोकण हा अतिपर्जन्यमानाचा प्रदेश असूनही मोठय़ा प्रमाणात पाणी समुद्राला जाऊन मिळते व डिसेंबर, जानेवारीपासून पाणीटंचाईस समोर जावे लागते. त्यामुळे पाणी अडवून व जिरवून पाण्याचा शेती व गुरांना पिण्यासाठी तसेच बोअरवेल, विहिरीची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी नदी, नाले, ओहोळ, पऱयावर छोटे मोठे कच्चे, वनराई, व विजय बंधारे बांधल्यास मोठय़ा प्रमाणात फायदा होऊन पाणीटंचाईच्या काळात दुर्भिक्ष्य टाळता येईल. त्यासाठी प्रत्येक ग्रा.पं.ने किमान 10 वनराई/कच्चे/विजय बंधारे नदी, नाले, ओहोळ येथे बांधून पाणी अडवणे व जिरवणे गरजेचे आहे.

 गावातील या जलस्त्राsतांजवळ बंधारे बांधल्यास लगतच्या विहिरीची, बोअरवेलची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. जेणेकरुन उन्हाळी शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्नही काही अंशी सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यावर्षीचे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱयांना उन्हाळी पिकांच्या उत्पन्नात वाढ होऊन  शेतकऱयांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने लोकसहभागातून किमान 10 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हय़ातील ग्रामपंचायतींना जि. प. कृषी विभागस्तरावरून देण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये बंधारे बांधण्याचा हा प्रयोग यशस्वीही झाला आहे.

  पाणी अडवण्यासाठी तात्पुरते कच्चे, वनराई व विजय बंधारे बांधल्यास लाखो लिटर पाणी साठवण क्षमता वाढते. तसेच टंचाई काळात पाण्याचे दुर्भिक्ष्यही टाळता येते. जिल्हय़ात ग्रामपंचायत स्तरावर ही मोहीम सुरू आहे. जिह्यात 845 ग्रामपंचायती असून डिसेंबर 2021पर्यंत 337 बंधारे बांधण्यात आले होते. त्यामध्ये जानेवारी 2022 मध्ये आता वाढ झाली आहे. 12 जानेवारीपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्य़ात एकूण 754 बंधारे पूर्णत्वास गेले आहेत. त्यामध्ये वनराई 125, विजय बंधारे 167, तर कच्चे बंधारे 462 बांधण्यात आले आहेत.

तालुकानिहाय बांधण्यात आलेले श्रमदानातील बंधारेः

  तालुका         बंधारे

 मंडणगड         54

 दापोली          92

 खेड            69

 चिपळूण         121

 गुहागर          94

 संगमेश्वर         97

 रत्नागिरी         83

 लांजा           79

 राजापूर         65

Related Stories

राज्य मराठी अध्यापक संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी भरत गावडे

Ganeshprasad Gogate

पाट येथे रक्तदान शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद

Patil_p

दापोलीत चिरेखाण सुरू केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Patil_p

राजापूर भालावली येथील मंदिरात चोरी

Abhijeet Shinde

दापोलीत विद्यार्थ्यांसाठी सैनिक प्रशिक्षण कॅम्प

Abhijeet Shinde

मत्स्य पॕकेजचे पैसे खात्यात जमा होईपर्यंत उपोषण आंदोलन होणार

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!