Tarun Bharat

मिशन मोदी अगेन पीएम मोहिमेचा राज्यात विस्तार करणार

प्रतिनिधी/ वास्को

मिशन मोदी अगेन पीएम या मोहिमेचा गोव्यात विस्तार येणार असून गोवाभरात सहाशे कार्यकर्त्यांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची देशाला सतत गरज भासणार असून देशाच्या भवितव्यासाठी घर घर मोदी निर्माण करण्याचे ध्येय मिशन मोदी अगेन पीएमने ठवलेले आहे. गोव्यात भाजपाचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठीही मिशन मोदी कार्यरत राहणार आहे असे प्रतिपादन मिशन मोदी अगेन पीएमचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राम गोपाल काका यांनी केले आहे.

मिशन मोदी अगेन पीएम राष्ट्रीय मोहिमेने देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या समर्थनात प्रचार व प्रसार कार्य चालवले आहे. देशातील विविध राज्यात या मोहिमेच्या शाखा असून गोव्यात या मोहिमेच्या कार्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे राम गोपाल काका यांनी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषेद सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत गोवा प्रदेश अध्यक्ष अजयसिंह लांबा, प्रदेश महिला अध्यक्ष सुमन शर्मा, महिला महामंत्री भक्ति खडपकर, निखिल शर्मा, वरूण गौर, एसएम. शर्मा, अविनाश तिवारी, अमित माथुर, मनोज महेश्वरी, पवन गंगवाल, अनुज शर्मा, विनय सिंह, जी. के. श्रीवास्तव व राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत मिशन मोदी पीएम अगेनचे कार्य व ध्येयाविषयी माहिती दिली.

वास्को बायणातील रविंद्र भवनात संस्थेतर्फे एक दिवसाची कार्यशाळा कार्यकर्त्यांसाठी घेण्यात आली. या कार्यशाळेत भाजपाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांबरोबरच कोरोना काळात सामाजीक कार्य केलेले कार्यकर्ते तसेच इतर कार्यकर्तेही ज्यांना पंतप्रधान मोदींची कार्यपध्दती आवडलेली आहे असे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूण 70 कार्यकर्त्यांनी या कायशाळेचा लाभ घेतला. त्यांना पंतप्रधान मोदींच्या कार्याबाबत जागृती करण्याबाबत मार्गदर्शन तसेच सामाजीक कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याचे राम गोपाल काका यांनी सांगितले. कार्यशाळेत माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्यासह भाजपाचे मुरगाव गट अध्यक्ष संजय सातार्डेकर यानीही उपस्थित राहून सहभाग दर्शवला. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील या मोहिमेचे पदाधिकारीही उपस्थित राहिल्याची माहिती राम गोपाल काका यांनी दिली.

गोवा प्रदेश शाखेच्या कार्याचा विस्तार करण्यात येणार आहे. लवकरच गोव्यातील 600 कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच गोव्यात 6 हजार कार्यकर्त्यांचे एक भव्य संमेलन आयोजित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मोदी एकटेच सर्वकाही करू शकत नाहीत. त्यामुळे मिशनला घरा घरात मोदी निर्माण करायचे आहेत. मिशन केवळ निवडणुकीचे कार्य करीत नसून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहितीही घरा घरात पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. मोंदीच्या कार्याबाबत मिशन समाधानी आहे. गोव्यातही प्रमोद सावंत सरकार चांगले कार्य करीत असून येणाऱया विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी मिशन मोदी अगेन पीएम पूर्णपणे कार्यरत राहणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

Related Stories

हा गोमंतकीयांचा सन्मान : दयानंद सोपटे

Amit Kulkarni

कोलवाळ कारागृहातून ड्रग्ज, मोबाईल, रोकड जप्त

Amit Kulkarni

मडगाव – नावेली चौपदरी रस्त्यालगत इमारतींतील रहिवाशांना दिलासा

Amit Kulkarni

नागेश गोसावी यांचा विर्नोडा येथे सत्कार

Amit Kulkarni

शिमगोत्सवावर ‘कोरोना’चे सावट

Amit Kulkarni

चांदर मार्केट आजपासून 5 दिवस बंद

Omkar B