Tarun Bharat

मिसबाह, वकार युनूस यांचा प्रशिक्षकपदाचा राजीनामा

Advertisements

वृत्तसंस्था/ कराची 

पाक क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक मिसबाह उल हक आणि गोलंदाज प्रशिक्षक वकार युनूस यांनी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा महिनाभराच्या कालावधीत सुरू होण्यापूर्वी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देवून अनपेक्षित धक्का पीसीबीला दिला आहे.

पाकचे माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हक आणि वकार युनूस यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा सोमवारी पीसीबीकडे सादर केला असून आता पीसीबीने काही दिवसांसाठी माजी कसोटीवीर सकेलन मुस्ताक आणि अब्दुल रझाक याची हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. 13 सप्टेंबर रोजी पीसीबीच्या बैठकीमध्ये रमीझ राजाची चेअरमनपदी निवड केली जाणार आहे.

मिसबाह आणि वकार युनूस यांची 2019 च्या सप्टेंबरमध्ये पीसीबीने प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. या दोघांचाही प्रशिक्षकपदाचा कालावधी अद्याप एक वर्ष बाकी होता पण त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून पीसीबीला धक्का दिला आहे. 11 सप्टेंबरला न्यूझीलंडचा संघ पाकमध्ये वनडे आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. पीसीबीला पुढील महिन्यात होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी प्रमुख प्रशिक्षक आणि गोलंदाज प्रशिक्षकांची नियुक्ती करावी लागणार आहे.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंचा जिममध्ये सराव

Patil_p

प्ले-ऑफ निश्चितीसाठी मुंबईला आज शेवटची संधी

Amit Kulkarni

आयुषी पोद्दारला नेमबाजीत सुवर्णपदक

Patil_p

ऑस्ट्रेलियाचे पाकला चोख प्रत्युत्तर

Patil_p

लंकेचा ऑस्ट्रेलियावर 26 धावांनी थरारक विजय

Patil_p

ब्रिटनचा डॅन इव्हान्स पराभूत

Patil_p
error: Content is protected !!