Tarun Bharat

मिसळ आणि पाव

परवा मला असा भास झाला की देशापुढील सर्व प्रश्न सुटले आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळू लागले. एकही शेतकरी कर्जबाजारी नाही. देशभर प्रत्येक क्षेत्रात लाखो नोकऱया उपलब्ध झाल्या आहेत. बाजारातली मंदी गायब झाली आहे. सरकारी, सहकारी आणि खाजगी बँकांची कार्यक्षमता प्रचंड वाढली आहे. राजकीय नेत्यांनी आचरट विधाने करणे सोडले आहे. लोकांनी व्हॉट्सअपवर वेळ घालवणे, तिथे फालतू संदेश लेखन करणे, आलेले संदेश खातरजमा न करता फॉरवर्ड करणे वगैरे घातक सवयी सोडल्या आहेत. विविध जातीधर्माच्या लोकांमध्ये भांडणे लावणे पुढाऱयांनी सोडले आहे. टीव्हीवरच्या फडतूस मालिका बंद पडून तिथे पुन्हा (दूरदर्शन वाहिनीवर पूर्वी झालेल्या दर्जेदार मालिकांप्रमाणे) चांगल्या मालिका दिसू लागल्या आहेत. असा सारा देश प्रश्नमुक्त झाला आहे. लोक उठता बसता आमीर खानच्या सिनेमातलं ‘ऑल इज वेल’ हे गाणं तारस्वरात गुणगुणू लागले आहेत.

मग बिचाऱया सवंग मराठी वृत्तवाहिन्यांनी काय करायचे हो? त्यांना टीआरपी कोण देणार? त्यांची सुटलेली पोटे कशी भरणार?

तरी त्यातल्या त्यात किंचित बुद्धिमान असलेल्या एका गडय़ाने टीआरपीसाठी शक्कल लढवलीच. त्याने देशभरातल्या आणि विदेशातल्या एनआरआय विचारवंत बांधवांना आवाहन केले आणि एका घनगंभीर विषयावर भारदस्त चर्चेसाठी पाचारण केले. काय होता तो विषय? श्वास रोखून धरा हं.

विषय होता मिसळबरोबर पाव खावा की ब्रेड? पाव आणि ब्रेड यातला फरक मज पामराला ठाऊक नसल्याने मी ती चर्चा बघण्याचे धाडस केले नाही. पण मला देखील काही टीआरपी पोटेन्शDिालयुक्त विषय सुचले आहेत ते असे

वधूपरीक्षेला गेल्यावर कांदेपोहे खाताना घासात खडे आले तर ते कुठे लपवावेत आणि त्यांची विल्हेवाट कशी लावावी? कांदे महाग असतील तेव्हा कांदेपोह्यांऐवजी लसूणपोहे करता येतील का? मिसळ-पाव (किंवा मिसळ-ब्रेड खाताना) हॉटेलवाले जी लिंबाची सूक्ष्म फोड देतात ती पिळताना त्यातला हाताला लागलेला रस कुठे पुसावा? ती फोड नंतर कुठे टाकावी? लिंबातल्या बिया मिसळीच्या रश्शात पडल्या तर त्या कशा शोधाव्यात?

गरीब आर्थिक स्थितीतील प्रियकर-प्रेयसींना प्रियाराधन परवडावे म्हणून हॉटेलवाले कटिंग चहाच्या धर्तीवर कटिंग कॉफी विकण्याची पद्धत सुरू करतील का?

Related Stories

भयंकर वणवे, प्रलयंकारी महापूर, उपाय काय?

Amit Kulkarni

परीक्षेच्या वादावर पडदा

Patil_p

पूर्वीं देखिला न ऐकिला

Patil_p

मोदींचे अश्रू

Patil_p

राष्ट्रपतीपदाची निवडणूक : पुढील होयबा कोण?

Patil_p

खुर्चीच्या ओढाताणीत जनतेची कुतरओढ!

Patil_p