Tarun Bharat

मिस यू मित्रानो, भावांनो स्टेटस ठेऊन तरूणाची आत्महत्या

मयत तासगाव तालुक्यातील, जत शहरात केली आत्महत्या

जत / प्रतिनिधी

जत शहरातील विठ्ठल नगर शेजारील पानमळ्यात “मिस यु मित्रांनो, मिस यु भावांनो” तसेच माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असे मोबाईल वर स्टेटस ठेवून एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर श्यामा पवार (वय 19, रा.सावळज, ता. तासगाव) असे मृत तरूणाचे नाव असून शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या पूर्वी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, याबाबत जत पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तासगाव तालुक्यातील सावळज येथील गोलार समाजातील शंकर पवार इयत्ता बारावी मध्ये शिक्षण घेत होता. चार दिवसापूर्वीच जत येथे आपल्या बहिणी कडे तो राहण्यासाठी आला होता. गुरुवारी रात्री तो आपल्या मोबाईल स्टेटस् वर “मिस यु मित्रांनो मिस यु भावांनो” तसेच माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, असे लिहित तो बेपत्ता झाला.

त्याचा स्टेटस त्याचे जत मधील सर्व नातेवाईक बघताक्षणी त्याच्या शोधा शोध घेऊ लागले. पण त्याचा पत्ता लागला नाही. शिवाय, नातेवाईकांनी पोलीस स्टेशनची धाव घेत शंकर बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. रात्रभर शोधाशोध केल्यानंतर त्याचं काही पत्ता लागला नाही. शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान जत येथील विठ्ठल नगर शेजारी असणारे पानमळा येथील झाडास त्याने गळफास घेतला असल्याचे समजले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. या घटनेची जत पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Related Stories

Video-चिमुकल्याने खा.अमोल कोल्हेंना जोडले दोन्ही हात

Abhijeet Khandekar

सीमारेषेवरून 250-300 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत

datta jadhav

पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळून 20 ठार

Patil_p

चिंता वाढली : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5537 नवे कोरोना रुग्ण; 198 जणांचा मृत्यू

Tousif Mujawar

सांगली : बागणीतील रेशनकार्डचा घोळ मिटेना

Archana Banage

खासगी इन्स्टिट्यूटप्रमाणे सांगली महापालिकेची पहिली कॉर्पोरेट अभ्यासिका

Archana Banage