Tarun Bharat

मि.रॉ क्लासिक जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा 2 एप्रिल रोजी

मि. रॉ फिटनेस स्पर्धा जिम मर्यादित; मान्यवरांच्या हस्ते चषकांचे अनावरण

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

रॉ फिटनेस बेळगाव व बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मि. रॉ क्लासिक’ जिल्हास्तरीय व मि. रॉ फिटनेस जिम मर्यादित शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. 2 एप्रिल रोजी धर्मवीर संभाजी उद्यान महाद्वार रोड येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या चषकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

आयबीबीएफच्या नियमानुसार कोविड नियमांचे पालन करीत जिल्हास्तरीय व जिम मर्यादित स्पर्धा 55, 60, 65, 70, 75, 80 व 80 किलोवरील अशा सात वजनी गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या पाच विजेत्यांना 2500, 2000, 1500, 1000, 1000 रूपये, पदके व भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. मि. रॉ क्लासिक विजेत्या स्पर्धकाला रोख 5 हजार रूपये, आकर्षक चषक, प्रमाणपत्र, भेटवस्तू तर पहिल्या उपविजेत्याला 3 हजार रूपये, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिम मर्यादित स्पर्धकांनाही रोख रक्कम, प्रमाणपत्र व पदके देवून गौरविण्यात येणार आहे. 2 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत स्पर्धकांची वजने घेतली जाणार असून सायंकाळी 4 वा. स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

रॉ फिटनेसच्या जिममध्ये मि. रॉ क्लासिक व मि. रॉ फिटनेस या स्पर्धेच्या चषकांचे अनावरण आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्दण्णावर, एम. के. गुरव, एम. गंगाधर, सुनील राऊत, जिमचे संचालक विजय चौगुले, अभय चौगुले, अमेय चौगुले, प्रशांत पाटील, सोमनाथ बिर्जे, अशोक मुंगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Stories

आंबेवाडी येथे साऊंड सिस्टीम जप्त

Amit Kulkarni

‘स्त्री हा कुटुंबाचा चेहरा’ मानणाऱया डॉ. निरंजना महांतशेट्टी

Omkar B

कचरा डेपोवरील दूषित पाणी मार्कंडेय नदीत

Patil_p

निवडणूक कर्तव्यावरील एएसआयचा हृदयाघाताने मृत्यू

Amit Kulkarni

इनफीनिटम व्योमामध्ये ज्ञानप्रबोधन मंदिरचे सुयश

Amit Kulkarni

दिल्ली विमानफेरीमुळे वेळापत्रकात होणार बदल

Amit Kulkarni