Tarun Bharat

…मी कधी पाठीमध्ये खंजीर खुपसला नाही : एकनाथ खडसे

  • एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश! 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजप वर जोरदार टीका केली. गेली 40 वर्ष मी भाजपमध्ये काम करत आहे, त्यामुळे पक्ष सोडताना नक्की दुःख होत आहे. पण भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला. मी खूप संघर्ष केला. संघर्ष माझा स्थायी स्वभाव आहे. समोरसमोर लढलो. मी पाठीमध्ये कधी खंजीर खुपसला नाही. भारतीय जनता पक्षाने मला अडगळीत टाकले. गोड बोलून धोका देणे मला जमत नाही असे सांगत मी गेली 40 वर्ष काम करून मला काय मिळाले? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


पुढे ते म्हणाले, शत्रूंनी माझ्यावर विनयभंगाचा आरोप लावला. सीबीआय, एसीबी लावली. भूखंडाची चौकशी माझ्या मागे लावण्यात आली. काही दिवस जाऊद्या कुणी किती भूखंड घेतले आहेत ते मी दाखवून देईन. नियमाच्या बाहेर जे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार आहे असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. 

  • राष्ट्रवादीत जावे ही कार्यकर्त्याची इच्छा 


मी निष्ठेने राष्ट्रवादीचे काम करेन. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे रहा. मी दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवेन. राष्ट्रवादीत जावे ही माझ्या कार्यकर्त्याची इच्छा. नाथाभाऊंची ताकद काय जळगावमध्ये दाखवेन. 


पुढे ते म्हणाले, मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे ना.. म्हणून मी आलो राष्ट्रवादीत असे म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचे ओझं हलकं झाल्यासारखे वाटते आहे असेही खडसे यांनी म्हटले आहे.

Related Stories

गुगल जिओमध्ये करणार 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक

datta jadhav

तुझे खेळ बंद कर नाहीतर, पळताभुई थोडी होईल; क्षीरसागरांचा इंगवलेंना इशारा

Archana Banage

मथुरा : जिल्हा रुग्णालयातील मुख्य चिकित्सा अधीक्षकास कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

साजणीत सरपंच व उपसरपंच अपात्र,परिसरात खळबळ,जिल्ह्यातील पहिलीच घटना

Archana Banage

तरुण भारतच्या बातमीचा इम्पॅक्ट: मृत गव्याला वनविभागाने नदीपात्रातुन काढले बाहेर

Abhijeet Khandekar

केंद्र सरकारची दिडपट हमीभावाची भूलथापच : राजू शेट्टी

Archana Banage
error: Content is protected !!