Tarun Bharat

`मी बरा आहे..’ पण काहीही करून भावाला वाचवा.!

कृष्णात पुरेकर / कोल्हापूर

पुण्याहून आलेला पुतण्यामुळे पहिल्या लाटेत संपुर्ण कुटुंब संसर्गित झाले. दुसऱया लाटेत संशयितांचे स्वॅब तो घेत होता. त्यातून झालेला संसर्ग त्याने अंगावर काढला, अन् चार दिवसांत तो कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. पाठोपाठ थोरला भाऊही पॉझिटिव्ह आला. `आयसीयू’मध्ये दोघांवर समोरासमोर उपचार सुरू होते. इंजेक्शनचा तुटवडा.. त्यासाठी मित्रांना मॅसेज.. `बापू… काहीही करा.. पण भावाला वाचवा..त्यापुढे मी बरा आहे..’ हा अखेरचा संदेश. त्यानंतर डोळÎांसमोर धाकटा भाऊ गेला.. त्याच्या धक्क्यातच दोन दिवसांनी थोरला भाऊही गेला.

जिल्हÎातील ग्रामीण भागातील पती-पत्नी शिक्षक.. त्यांचा थोरला मुलगा शिक्षक तर धाकटा लॅब टेक्निशियन. दोघेही निर्व्यसनी अन् शासकीय सेवेत. आईवडील सेवानिवृत्तीनंतर गावातच स्थायिक झाले. दोन्ही मुलांचे संसार फुलत होते. थोरल्याचा मुलगा पुण्यात सर्व्हिसला. पहिल्या लाटेत तो गावी आला, त्याचं `वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं. त्याला कोरोना संसर्ग झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या धक्क्यातून पॉझिटिव्ह झालेलं कुटुंब कोरोनामुक्त झालं.  कोरोनावर मात करू शकतो, हा विश्वास त्यांच्यात आला.

गावातून रोज हिवताप कार्यालयातील सहकाऱयांसमवेत तो दुचाकीवरून येत होता. दुसऱया लाटेत संशयितांचे स्वॅब घेताना त्याच्या सहकाऱयाला संसर्ग झाला, तो पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोंटाईन झाला, त्याच्यापासून यालाही संसर्ग झाला. सामान्य सर्दी-ताप म्हणून गावीच उपचार घेतले. पाचव्या दिवशी ताप वाढला, अन् मित्रासमवेत तो दुचाकीवरून कोल्हापुरात आला. खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली अन् त्याची प्रकृती खालावली. त्याच्या मदतीसाठी थोरला भाऊ हॉस्पिटलमध्ये थांबला.

थोरला भाऊही पॉझिटिव्ह आला, अन् तीनच दिवसांत धाकटÎा भावाच्या शेजारी अतिदक्षता विभागात त्याच्यावरही उपचार सुरू झाले. रेमिडीसीव्हीरचे शॉर्टेज.. अन् दोघांकडून `रेमिडीसीव्हीर’साठी मित्रांना मॅसेज सुरू झाले. एक, दोन मिळाली, पण त्याने फारसा फरक नाही.. अशा स्थितीत `इंजेक्शन आहेत.. ब्लॅकने घ्या.. पण आणा..’ हा मॅसेज पडला. दुसऱया दिवशी  `बापू… काहीही करा.. पण भावाला वाचवा..’ मॅसेज आला. आरोग्य विभागात असूनही इंजेक्शनसाठी  धाकटÎा भावाची डोळÎांसमोर सुरू असलेली तडफड तो पहात होता. अन् `बापू… मी बरा आहे.. पण काहीही करा.. भावाला वाचवा..’ हा अखेरचा संदेश त्याने पाठवला. त्यानंतर काही क्षणात धाकटÎा भावाने या जगाचा निरोप घेतला.. अन् त्याच्या मानसिक धक्क्यातून थोरला भाऊही कोम्यात गेला.

मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात धाकटा भाऊ गेला. दोन दिवसांत थोरल्या भावानंही मृत्यूला कवटाळले. पहिल्या लाटेत पुतण्याचा कोरोनाने झालेला मृत्यू समोर होता. त्याकडं केलेले दुर्लक्ष. आरोग्य कर्मचारी असूनही कोरोना अंगावर काढणं त्याला सरणापर्यत घेऊन गेलं. सोबत जीवापाड प्रेम करणाऱया भावालाही कोरोनानं हिरावलं. कोरोनामुळे शिक्षक दांपत्यावर नातवासह दोन्ही मुलांना गमावल्याचं आभाळाएवढं दुःख कोसळलंय. त्यांना माणूसकीतून मिळेला मानसिक आधार या धक्क्यातून सावरतोय, तर मृत्यूशी संघर्ष सुरू असताना मित्रांना पाठवलेले संदेश आजही त्यांची आठवण करून देत आहेत.

Related Stories

कृषीपंप ग्राहकांनी थकबाकीमुक्त व्हावे

Archana Banage

Kolhapur : इन्स्पायर अवॉर्डमध्ये कोल्हापुरची बाजी

Abhijeet Khandekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापुरात

Abhijeet Khandekar

शिरोळ तालुक्यात लम्पीचा दुसरा बळी

Archana Banage

कोल्हापूर : दुग्धव्यवसाय धारकही आर्थिक अरिष्ट्यात

Archana Banage

मधमाश्यांच्या हल्ल्यात सहा जण जखमी

Archana Banage