Tarun Bharat

मी मंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो: विजयेंद्र

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी गुरुवारी सांगितले की ते मंत्रीपदासाठी किंवा उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नव्हते आणि त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मला मंत्रिपद मिळावे म्हणून कोणताही दवावं हाय कमांडवर आणला नव्हता.

गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “मी फक्त ४५ वर्षांचा आहे, ७७ किंवा ७८ वर्षांचा नाही. भविष्यात मला पक्षात चांगली पदे मिळू शकतील. पदांची अजिबात अपेक्षा न करता, मी स्वत: ला पक्षाला पुढे घेऊन जाण्याच्या कामात गुंतलो आहे.” माझ्या वडिलांनी कधीच विचार केला नव्हता की जेव्हा ते पक्ष वाढविण्यासाठी सायकलवर शहरे आणि खेड्यांना भेटी देऊ लागले तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. माझीही अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही, असे विजयेंद्रने सांगितले. “हे खरे आहे की काही मंत्री आवडीची खाती न मिळाल्याने नाराज आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, पक्ष हायकमांडच्या मदतीने ते प्रकरण हाताळतील,” असे ते म्हणाले.

दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना त्यांनी आपल्या एका मुलाला केंद्रीय मंत्री, दुसऱ्या मुलाला राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे तसेच मी सांगेल तोच मुख्यमंत्री करावा लगेल अशा तीन अटी घातल्या असल्याचे बोलले जात होते.

Related Stories

SSC Result 2021: दहावीचा उद्या ऑनलाईन निकाल

Archana Banage

नाना पटोलेंच्या घोषणेमुळे राष्ट्रवादी-शिवेसेनेला कापरं भरलंय – देवेंद्र फडणवीस

Archana Banage

मंत्र्यांना जाब विचारायला शेतकरी उद्यापासून मैदानात, २५ ला चक्काजाम – राजू शेट्टी

Abhijeet Khandekar

देशात लवकरच मिश्र लसीकरण?

datta jadhav

मुकुल रोहतगी पुन्हा होऊ शकतात महाधिवक्ता

Archana Banage

राजोरीत दहशतवाद्यांच्या गटाला घेरले

datta jadhav