Tarun Bharat

‘मी मोदींचा हनुमान’ : चिराग पासवान

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात असून राजकीय डावपेचांचीही चलती सुरू आहे. निवडणुकीच्या तोंडवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी पंतप्रधान मोदींना आपला कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट केले. केवळ मुख्यमंत्री नितीश कुमार यांना विरोध असून आपण पंतप्रधान मोदींचे ‘हनुमान’ आहोत, असे विधान त्यांनी केले आहे. मात्र हा त्यांच्या डावपेचाचा भाग असून भाजप-संजद युतीत गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपने केली. राज्यात भाजप-संजद युती अभेध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. चिराग पासवान ‘व्होट कटवा’ असल्याचा आरोप करण्यात आला.

Related Stories

राहुल गांधींचा आसाममध्ये प्रचार

Patil_p

लाचखोरीप्रकरणी आयपीएस मनीष अग्रवाल अटकेत

Patil_p

देशभर शिवरात्रोत्सव उत्साहात साजरा

Patil_p

राफेलचे आगमन अवघ्या 36 तासांवर

Patil_p

नीरवच्या प्रत्यार्पणातील महत्त्वाचा अडथळा दूर

Patil_p

अंदमान-निकोबारमध्येही दिसली ‘उडती वस्तू’

Patil_p