Tarun Bharat

मी वानखेडेंना दिल्लीत चौकशीसाठी बोलावलं नव्हतं

ऑनलाईन टीम / मुंबई :

आर्यन खान प्रकरणात लाचखोरीचा आरोप असलेले एनसीबीचे मुंबई झोनचे डायरेक्टर समीर वानखेडे आज दुपारी दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात दाखल झाले होते. काही वेळापूर्वीच ते मुख्यालयातून बाहेर पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वानखेडेंची दोन तास चौकशी केल्याचे वृत्तही सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यावर एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ज्ञानेश्वर सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण आज कोणालाही चौकशीसाठी बोलावलेलं नाही. ते माझ्या सांगण्यावरुन दिल्लीत आलेले नाहीत. समीर वानखेडेंची चौकशी करायची असती तर त्यांना आपण बोलावलं असतं.

दरम्यान, कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुख्य साक्षीदार बनलेल्या किरण गोसावीने शाहरूख खानकडे हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटींची मागणी केली होती. ही डील 18 कोटींना सेटल होणार होती. यामधील 8 कोटी एनसीबी अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचा धक्कादायक खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने रविवारी केला होता. त्यानंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली. त्यामुळे समीर वानखेडे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात असल्याचे एनसीबीकडून काल सांगण्यात आले होते. त्यानंतर आज वानखेडे थेट दिल्लीतील मुख्यालयात दाखल झाले. मात्र, एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी वानखेडे यांना चौकशीसाठी बोलावले नसल्याचे म्हटले आहे.

Related Stories

आधुनिक रायफलींसाठी भारताचा रशियासोबत करार

datta jadhav

अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

datta jadhav

‘अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान’; सुप्रिया सुळेंची टीका

Archana Banage

भारताकडून चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी

datta jadhav

कोपार्डे येथे मरकज कार्यक्रमातील तरुण आल्याने तणाव

Archana Banage

संपत्तीच्या वादातून भावानेच काढला भावाचा काटा

mithun mane