Tarun Bharat

मी शरद पवारांचे राजकारण नासवलय

आ. जयकुमार गोरे ; भाजपमध्ये येण्यासाठी देशमुख फडणवीसांच्या हातापाया पडत होते 

प्रतिनिधी/ दहिवडी

मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायची, पाणीयोजना पूर्ण करायची मस्ती आहेच. मी माणचे नव्हे तर शरद पवारांचे राजकारण नासवलय हे जिह्याला माहित आहे. पवारांचा सच्चा सैनिक म्हणविणारे प्रभाकर देशमुख भाजपमध्ये घ्या म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हातापाया पडत होते. पवारांनी कायम सहकार्य केलेले देशमुख निवृत्तीनंतर पवारांचाच कार्यक्रम करायला निघाले होते असा गौप्यस्फोट आ. जयकुमार यांनी केला. जनतेला लुबाडून भ्रष्टाचाराने गोळा केलेली त्यांची  संपत्ती लवकरच रडारवर येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

विरळी येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आ. गोपीचंद पडळकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव, सिध्दार्थ गुंडगे, लिंगराज साखरे, बाळासाहेब माने, धर्मदेव पुकळे, सरपंच प्रशांत गोरड, बबनराव काळे, धनाजी कदम, नरळे साहेब, अमर गोरड, हेमंत नलवडे, आप्पासाहेब आटपाडकर, सोपानराव गोरड,  गावोगावचे सरपंच, उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

आ. गोरे पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत रावणरुपी लुटारु देशमुखांनी कधी नव्हे ते मतदारसंघात जातीपातीचे राजकारण केले. पैशांच्या जीवावर 88 हजार मते घेतली. मात्र कोरोना काळात ते कुलूपबंद होते. ते गायब असल्याची बोंबाबोंब सुरु झाल्यावर शेवटी शेवटी विविध कंपन्यांकडून काही पैसे आणायचे नाटक करताना त्यातही भ्रष्टाचार केला. लोधवडेतील देशमुखांच्या उसालाही मी आणलेले उरमोडीचे पाणी मिळते. मी मतदारसंघात आल्यावरच पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पना सुरु झाली. साखळी सिमेंट बंधारे माझ्याच काळात झालेत त्यामुळे जयकुमारचे नाव घ्यायचीही देशमुखांची लायकी नाही. मी त्यांच्यासारखा लुटारु रावण नाही. माण खटावच्या जनतेचा मी सेवक आहे. मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायला मला पुन्हा आमदार व्हायचे आहे, त्यासाठी तुमच्यासारख्या बाजारबुणग्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. नोकरीत असताना महत्वपूर्ण पदे भोगली मात्र तेव्हा कुणाला नोकरीला लावले नाही. सीओ असताना एमआयडीसीसाठी काही केले नाही. आम्ही अगोदर पाणी आणले आणि नंतर एमआयडीसी मंजूर करुन घेतली. फाटलेल्या आभाळाला टाके घालायचे काम मी गेली 12 वर्षे करतोय. 143 कोटींच्या निधीतून शेतकऱयांच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची कामे सुरु आहेत. माझ्या मतदारसंघातील सर्व भागात पाणी नेल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. माणमधील 24 पैकी 18 सोसायटय़ा आमच्या ताब्यात आल्यात पण आम्ही मस्ती केली नाही. देशमुख मात्र थोडय़ा सोसायटय़ा ताब्यात येताच हुरळून गेले आहेत. नोकरीत त्यांना पगार किती होता, त्यांच्याकडे किती संपत्ती आहे याची लवकरच चौकशी होणार आहे. त्यांच्याकडील माल बघून त्यांचीच पार्टी त्यांना सोडत नाही. जनताही तुम्हाला सोडणार नाही. लवकरच जिहेकठापूरच्या पाण्याने अंघोळ घालून त्यांचे शुध्दीकरण करावे लागणार असल्याचा टोलाही आ. गोरेंनी लगावला. 

आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, आ. जयाभाऊ देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी माण- खटावच्या जिहेकठापूरसाठी मोठय़ा निधीची तरतूद केली आहे. जयाभाऊंच्या रुपाने दुष्काळी भागाचा आवाज विधानसभेत यापुढेही बुलंद रहाणे गरजेचे आहे. जयाभाऊंचे पैसेवाले विरोधक भ्रष्टाचारी आहेत. त्यांच्याकडे हजारो कोटींचे संपत्ती कुठून आली याची चौकशी होऊन ते नक्कीच जेलमध्ये जाणार आहेत. प्रत्येक अडचणीत केंद्रानेच राज्याला मदत केली आहे मात्र अनैसर्गिक आघाडीतून जन्माला आलेले आघाडी सरकार रोज केंद्राविरोधात बोंब मारत आहे. 

प्रास्ताविक जाधव गुरुजींनी केले. शिवाजीराव शिंदे, सरपंच प्रशांत गोरड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात जलदूत, कोरोना योध्दे आणि सोसायटीच्या नूतन संचालकांचा गौरव करण्यात आला. 

Related Stories

जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करुया

Patil_p

सातारा जिल्हय़ात कोरोनाचा वाढता कहर : 496 बाधित, 240 मुक्त

Archana Banage

शिवसेनेची भाजपच्या विरोधात पोवई नाक्यावर निदर्शने

Patil_p

रविवार पेठेत भरदिवसा चोरटय़ांचा थरार

Patil_p

सातारा जिल्ह्यात संसर्गचा विस्फोट थांबला, तरीही काळजी आवश्यकच

Archana Banage

साताऱयावर राहणार 32 कॅमेऱयांची करडी नजर

Amit Kulkarni