Tarun Bharat

मुंडेविरुध्द दुसर्या पत्नीचीही तक्रार

Advertisements

प्रतिनिधी / मुंबई

 राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत सापडले असून  त्यांनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचे मान्य केले होते. त्या करुणा शर्मा यांनीच आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे मुंडे यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यापूर्वी करुणा शर्मा यांच्या बहिणीने मुंडें विरोधात तक्रार केली होती. मात्र त्यांनी ती तक्रार मागे घेतली. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यांपासून कोंडून ठेवल्याचा आरोप केला आहे.

करुणा शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना त्यांच्या मुलांना भेटू दिले जात नाही. मुंडे आणि करुणा यांचे संबंध असून त्यातून त्यांना दोन मुले झाल्याचे मुंडे यांनी मान्य केले होते. करुणा यांनी मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमांर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर आपल्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप  केला आहे. करुणा शर्मा यांनी तक्रारीत त्यांच्या 14 वर्षीय मुलीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून मुलांना ज्या ठिकाणी ठेवले आहे तिथे केवळ पोलीस आहेत. त्या ठिकाणी मुलीची काळजी घेण्यास महिला नाही. जर मुलांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी केवळ मुंडे यांच्यावर राहील. मुंडे यांच्यावर बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल न झाल्यास आपण 20 फेब्रुवारी रोजी चित्रकूट बंगला, मंत्रालय किंवा आझाद मैदानात उपोषणाला बसणार असल्याचे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. करुणा शर्मा यांनी घेतलेल्या अशा भूमिकेमुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

  यापूर्वी केली होती त्या तरुणीने तक्रार

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तिच्या  आरोपांनुसार 2006 पासून आपल्यावर अत्याचार सुरू आहे. बॉलिवूडमध्ये संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप त्या तरुणीने तक्रारीत केला होता. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर त्या तरुणीच्या बलात्काराच्या आरोपानंतर मुंडे यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. ती तरुणी  आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत ( त्या तरुणीची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचे मान्य केले होते. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचे त्यांनी कबूल केलेले नाही. दरम्यान, 22 जानेवारीला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या त्या तरुणीने धनजंय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे तिने तक्रार मागे घेताना सांगितले. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिले होते.

Related Stories

ठाकरे आडनाव नसतं, तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते : गुलाबराव पाटील

prashant_c

उद्योजकांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी : उद्धव ठाकरे

datta jadhav

राजकारण केल्याने मुख्यमंत्री झालो : उध्दव ठाकरे

Rohan_P

महाराष्ट्रात ‘म्युकरमायकोसिस’चे 1780 रुग्ण

datta jadhav

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : छगन भुजबळ

prashant_c

वेदांताकडून किती टक्के मागितले होते, ठाकरेंवर अशीष शेलारांचा ट्विट्टरवार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!