Tarun Bharat

मुंबईचा इंडियन्सचा ‘तो’ व्हीडिओ काय सांगतो?

Advertisements

एकीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नियुक्त निवड समिती कोणतेही ठोस प्रतिपादन न करता रोहित शर्माला भारतीय संघातून वगळते, त्याच वेळी नव्हे तर त्यानंतर काही तासातच मुंबई इंडियन्स प्रँचायझी आपला कर्णधार फलंदाजीत सराव करत असतानाचा व्हीडिओ व काही छायाचित्रे प्रसारित करते, यात बरेच काही लपले असावे. मुंबई इंडियन्सने रोहित पूर्ण क्षमतेने सराव करत असल्याची छायाचित्रे व व्हीडिओ आपल्या ट्वीटर हँडलवरुन पोस्ट केली आहेत आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या त्यावर अक्षरशः उडय़ा पडल्या. आपल्या संघाचा भक्कम आधारस्तंभ व कर्णधार रोहित तंदुरुस्त आहे, याची ती पोचपावती होती. पण, याचवेळी बीसीसीआयने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱयातून कसे वगळले, हा नवा प्रश्न यामुळे उभा ठाकला गेला आहे.

मुंबई इंडियन्सने रोहितच्या तंदुरुस्तीचा आणखी उत्तम दाखला देताना तो सराव करत असतानाचा व्हीडिओ देखील पोस्ट केला असून यात ते रोहित पूर्ण तंदुरुस्त असल्याचा दावा करतात. अर्थात, रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या पुढील सामन्यात खेळू शकणार का, याबद्दल त्यांनी काही स्पष्ट केलेले नाही. रोहित यापूर्वी दि. 23 ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपरकिंग्स व दि. 25 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या लढतीत खेळू शकला नव्हता.

Related Stories

विश्वचषकातील ‘तो’ पराभव आजही सल देणारा

Patil_p

मुंबईचा दिल्लीवर सात गडयांनी विजय

Patil_p

बांगलादेश संघात शकीब अल हसनचे पुनरागमन

Patil_p

मुश्ताक अली स्पर्धेतील बाद फेरीचे सामने अहमदाबादमध्ये

Patil_p

‘रॉयल्स’ लढतीत आरसीबीची बाजी

Patil_p

वनडे मालिकेत बांगलादेशची विजयी सलामी

Patil_p
error: Content is protected !!